भाजपला 'अच्छे दिन'; विधानपरिषदेत अधिक जागा जिंकण्याची संधी

या जागा विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या असल्याने प्रत्येक जागा निवडून येण्यासाठी ३२ मतांची आवश्‍यकता आहे. विधानसभेतील संख्याबळ विचारात घेता भाजपचे पारडे जड आहे. भाजपच्या दोन जागा रिक्‍त होत असताना त्यांच्या तीन जागा सहजपणे निवडूनयेवू शकतात
BJP Has Chance To Increase Strength in Council
BJP Has Chance To Increase Strength in Council

मुंबई : राज्यात शिवसेना,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून विविध निवडणुकांमध्ये भाजपची पडझड तर आघाडीला विजय मिळत आहे. त्यातच येत्या एप्रिलमध्ये विधानपरिषदेतील नऊ सदस्यांच्या जागा रिक्‍त होत असल्याने या सभाग्रहात संख्याबळ वाढविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र विधानसभेत १०५ आमदारांचे बळ असल्याने भाजपला अधिकची जागा मिळण्याची शक्‍यता आहे.

महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून नुकत्याच झालेल्या सहा जिल्हापरिषदांच्या निवडणुकीत भाजपची पडझड झाली आहे. तसेच दोन दिवसापूर्वी काही महापालिका आणि नगरपालिका/नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीतही भाजपला हार पत्करावी लागली आहे. आता विधानपरिषदेतील संख्याबळ वाढविण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सरसावले आहे. २४ एप्रिल २०२० मध्ये विधानपरिषदेतील कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या प्रत्येकी तीन, भाजपच्या दोन तर शिवसेनेची एक जागा रिक्‍त होत आहे. 

या जागा विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या असल्याने प्रत्येक जागा निवडून येण्यासाठी ३२ मतांची आवश्‍यकता आहे. विधानसभेतील संख्याबळ विचारात घेता भाजपचे पारडे जड आहे. भाजपच्या दोन जागा रिक्‍त होत असताना त्यांच्या तीन जागा सहजपणे निवडून येवू शकतात. तरीही भारतीय जनता पार्टीची नऊ मते शिल्लक राहतात. ही नऊ मते, भाजपला पाठींबा दिलेले अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडीला पाठींबा दिलेले अपक्ष किंवा लहान पक्षांच्या आमदारांच्या जोरावर भाजप चौथा उमेदवार उभा करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपकडे झुकलेले आणि झुकु शकणा-या आमदारांना सत्तेच्या जोरावर आपल्याकडे वळविण्याचे कसब सत्ताधा-यांना दाखवावे लागणार आहे.

रिक्त असलेल्या व होणाऱ्या जागा

कॉंग्रेस - दिवंगत शिवाजीराव देशमुख, चंद्रकांत रघुवंशी, हरिसिंग राठोड
राष्ट्रवादी कॉंग्रेस - हेमंत टकले, आनंद ठाकूर आणि किरण पावसकर
भाजपा - स्मिता वाघ, दिवंगत पांडुरंग फुंडकर
शिवसेना - डॉ. निलम गो-हे

निवडून येण्यासाठी आवश्‍यक मतांचा कोटा - ३२
विधानसभेतील संख्याबळ - 
भाजप - १०५
 शिवसेना - ५६ 
राष्ट्रवादी कॉंग्रेस ५४ 
कॉंग्रेस - ४४ 
अन्य २९

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com