bjp government warned raju shetty | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

भाजप सरकारला गुडघे टेकायला लावू : राजू शेट्टी 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

औरंगाबाद ः स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला गुडघे टेकायला लावू असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी औरंगाबादेत येथे दिला. 

कर्जमुक्ती आणि शेती खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्‍वासन केंद्र सरकारने पाळावे असे आवाहन देखील शेट्टी यांनी केले. वैजापूर येथील मेळाव्याला रवाना होण्यापुर्वी शासकीय विश्रामगृहात शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वस्त्रद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर हे देखील उपस्थित होते. 

कर्जमाफी पासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा घाट सरकार घालत आहे. शेतकरी अडचणीत असतांना राज्याचे कृषीमंत्री भेटत नाहीत, आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांना भेटायला कुणी जात नाही असा टोला राजू शेट्टी यांनी यावेळी लगावला. देशातील इतिहासात पहिल्यांदा असे घडले की जनतेने भक्कम बहुमताचे सरकार निवडूण दिल्यावरही तीन वर्षात काहीच बदल झाला नाही. मोदी सरकार येण्याआधी देशावर 9.5 लाख कोटींचे कर्ज होते, ते यांच्या चुकीच्या धोरणांमुळे 13.5 लाख कोटींवर पोहचले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवण्यासाठी अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या माध्यमातून देशभरात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम सुरु आहे. अंतिम टप्यात 10 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीला नेऊन सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे वेधणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. 

170 संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची वोट बॅंक निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, कारण राज्यकर्त्यांना मतपेटीची भाषाच कळते असे सांगत तुम्हाला सत्तेत बसवले तसे विरोधात बसवण्याची देखील आमची ताकद असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख