रेणापूर पंचायत समितीवर भाजपची पकड

रेणापूर पंचायत समितीवर आलटून पालटून कधी कॉंग्रेस तर कधी भाजपची सत्ता राहिली आहे. वर्ष 1992 ला रेणापूर तालुक्‍याची निर्मिती झाली. त्यात पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून कॉंग्रेसच्या लालासाहेब चव्हाण यांची निवड झाली होती. वर्ष 2017 मध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा आमदार कॉंग्रेस पक्षाचा असतानाही भाजप नेते रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्‍यातील आठही जागा भाजपनेच जिंकल्या. 14 मार्च 2017 ला अडीच वर्षांसाठी भाजपचे अनिल भिसे हे बारावे सभापती झाले. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल आता संपत आहे.
 रेणापूर पंचायत समितीवर भाजपची पकड

रेणापूर : गत अडीच वर्षांसाठी पंचायत समितीचे सभापतिपद हे पद सर्वसाधारण पुरुषासाठी सुटले होते. पुढील अडीच वर्षांसाठी हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. सोमवारी सभापती, उपसभापतिपदाची निवड होणार आहे. पंचायत समितीच्या आठही जागा भाजपकडे असल्यामुळे या पदासाठी रमेश सोनवणे आणि बायनाबाई साळवे हे दावेदार आहेत. 

रेणापूर पंचायत समितीवर आलटून पालटून कधी कॉंग्रेस तर कधी भाजपची सत्ता राहिली आहे. वर्ष 1992 ला रेणापूर तालुक्‍याची निर्मिती झाली. त्यात पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून कॉंग्रेसच्या लालासाहेब चव्हाण यांची निवड झाली होती. वर्ष 2017 मध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा आमदार कॉंग्रेस पक्षाचा असतानाही भाजप नेते रमेश कराड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्‍यातील आठही जागा भाजपनेच जिंकल्या. 14 मार्च 2017 ला अडीच वर्षांसाठी भाजपचे अनिल भिसे हे बारावे सभापती झाले. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल आता संपत आहे. 

आता पुढील अडीच वर्षांसाठी तेराव्या सभापतीची ता. 30 डिसेंबरला निवड होणार आहे. हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. सर्व आठही पंचायत समितीचे सदस्य भाजपचेच असल्यामुळे त्यांना इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा सामना करावा लागणार नाही. भाजपचे पोहरेगाव गणातून निवडून आलेले रमेश सोनवणे आणि कारेपूर गणातून निवडून आलेल्या बायनाबाई साळवे हे दोघेच सभापतिपदाचे दावेदार आहेत. रेणापूर पंचायत समितीवर भाजप नेते कराड यांची पकड असल्यामुळे ते ज्याचे नाव सुचवतील त्यांच्याच गळ्यात सभापतिपदाची माळ पडेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. यात सभापतिपदी रमेश सोनवणे, तर उपसभापतिपदी अनंत चव्हाण यांची निवड होण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com