लातूर : भाजपचे सुधाकर शृंगारे यांना लोहामधून ६४ हजारांचे मताधिक्य

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली होती. सहाही मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
Latur-MP
Latur-MP

लातूर  :  लातूर अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांचा दोन लाख ८९ हजार १११ च्या मताधिक्याने पराभव करीत या मतदारसंघात दुसऱयांदा कमळ फुलवले आहे. या मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात श्री. शृंगारे यांना आघाडी मिळाली आहे. 


या मतदारसंघात भाजपचे शृंगारे व काँग्रेसचे कामंत यांच्या सरळ लढत झाली. यात श्री. शृंगारे यांनी दोन लाख ८९ हजार १११चे मताधिक्य घेतले.सर्वाधिक मताधिक्य लोहा तर सर्वात कमी मताधिक्य लातूर शहर विधानसभा मतदारसंघात मिळाले आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुधाकर शृंगारे यांना सहा लाख ६१ हजार ४९५ मते मिळाली. काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांना तीन लाख ७२ हजार ३८४ मतावरच समाधान मारावे लागले आहे. 

यानिवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे सिद्धार्थ सूर्यवंशी यांना सहा हजार ५४९, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अरुण सोनटक्के यांना पाच हजार २०८,  बहुजन मुक्ती पार्टीचे दत्तू करंजकर यांना दोन हजार १९४, वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर यांना एक लाख १२ हजार २५५,  स्वतंत्र भारत पक्षाचे रुपेश शंके यांना चार हजार ३५६, अपक्ष मधुकर कांबळे यांना एक हजार ३२६, पपिता रणदिवे यांना दोन हजार ९५,  रमेश कांबळे यांना दोन  हजार ११६ मते पडली आहेत.

२०१४ च्या निवडणुकीप्रमाणेच भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघातील सहाही लोकसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱया लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघात देखील भाजपलाच मताधिक्य आहे. लोहा मतदारसंघाने सर्वाधिक ६८ हजार ६६२ चे मताधिक्य दिले आहे. तर सर्वात कमी लातूर शहर मतदारसंघात १३ हजार ६८२ चे मताधिक्य मिळाले आहे. 

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढवली होती. सहाही मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com