bjp footback in marashtra politics shivsena | Sarkarnama

शिवसेनेसमोर भाजप एक पाऊल मागे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई : भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत विविध विकास प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. त्यात शिवसेनेनं आक्रमक होत सवतासुभा मांडून कोस्टल रोडचे भूमीपुजन केले. मात्र, आगामी निवडणूकांत शिवसेनेसोबत युतीची रणनिती आखत भाजपने दोन पावले मागे घेतली आहेत. 

मुंबई : भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत विविध विकास प्रकल्पावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. त्यात शिवसेनेनं आक्रमक होत सवतासुभा मांडून कोस्टल रोडचे भूमीपुजन केले. मात्र, आगामी निवडणूकांत शिवसेनेसोबत युतीची रणनिती आखत भाजपने दोन पावले मागे घेतली आहेत. 

मंगळवार (ता.18) ला कल्याण मधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे भूमिपुजन होत आहे. त्यावेळी शिवसेना नेत्यांना पंतप्रधानांच्या व्यासपिठावर स्थान देण्यात येणार आहे. यामधे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासोबतच कल्यण डोंबिवली महापौरांनाही निमंत्रण असून त्यांना मात्र मोदी यांच्या व्यासपिठावर स्थान मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचे सांगितले जाते. 

चार राज्याच्या निवडणूक निकालानंतर भाजपचा मित्रपक्ष शिवसेना अधिकच आक्रमक झाला आहे. मुंबईच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या कोस्टल रोडचे नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. या महत्वाच्या कार्यक्रमावर शिवसेनेनं संपुर्ण वर्चस्व ठेवले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले नाही. स्थानिक भाजप आमदारांना देखील महानगरपालिका प्रशासनाने निमंत्रित केले नाही. त्यामुळे भाजप शिवसेनेत पुन्हा वादाची दरी रूंदावल्याचे चित्र होते. मात्र, भाजप नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी सबुरीची सल्ला दिल्याने शिवसेने सोबत मिळते जुळते घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्‍त न करता मुंबईकरांसाठी कोस्टल रोड महत्वाचा आहे अशी प्रतिक्रीया दिली होती. 
कोस्टल रोडमध्ये भाजप नेत्यांना डावलल्याने कल्याणच्या मेट्रो भूमिपुजन समारंभात शिवसेनेला डावलून भाजप वचपा काढेल असे मानले जात होते. मात्र, भाजपच्या नेत्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेत दोन पाऊल मागे घेतल्याचे स्पष्ट केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख