भाजपचे काही चेहरे सेनेकडून रिंगणात उतरवण्याचे नियोजन

भाजपचे काही चेहरे सेनेकडून रिंगणात उतरवण्याचे नियोजन

मुंबई : परस्परांना सोबत घेवून पुढे जाण्याचे भाजप आणि शिवसेनेने या दोन्ही पक्षांनी दिल्ली व मुंबई अशा दोन ठिकाणहून झालेल्या चर्चेत पुन्हा एकदा मान्य केले आहे.  राज्याच्या प्रत्येक भागात महत्व दया तसेच नवी मुंबई, वर्धा, नाशिक आणि पुणे या जिल्हयात आम्हाला अस्तित्व टिकवण्यासाठी जागा दया, असा शिवसेनेने आग्रह धरल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली.

सेनेच्या आग्रहामुळे भाजप जेरीस आली आहे. सेनेला 126 जागा देत भाजपने 146 जागा लढण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. मात्र सेनेने 130 चा आकडा धरुन ठेवल्यास भाजपचे काही चेहरे सेनेकडून रिंगणात उतरवण्याचा निर्णयही घेतला जाईल असे समजते.

सेनेला सर्वत्र वाव हवा असल्याने त्यांचे काही उमेदवार कमळावर लढण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. दिल्लीतून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समक्ष शिवसेनेशी एकेका वादाच्या जागेवर चर्चा सुरू ठेवली होती. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य आणि उदयोगमंत्री सुभाष देसाई यांनी एकेका जागेचा आग्रह कायम ठेवला.

`सिटींग` व `गेटींग`चेसूत्र मान्य केल्यानंतर देवळीत समीर देशमुखांना जागा दया ,वर्ध्यात आम्हाला अस्तित्व हवे असा आग्रह सुरू झाला. या फुटकळ जागांवर होणारा आग्रह आज भाजपसमोरचे आव्हान ठरला होता. गणेश नाईक यांनी भाजपत प्रवेश घेतला असला तरी ऐरोली किंवा बेलापूरची एक जागा हवीच असेही सेनेने सातत्याने नमूद केले आहे. कोथरूड, हडपसर, पुणे कॅन्टोनमेंट, नाशिक, शहर धुळे अशा काही जागांबाबत सेनेने फारच आग्रह धरला आहे.

सोलापूर येथे सुभाष देशमुख, नाशकात सीमा अहेर, डॉ.राहुल अहेर यांच्या जागांवर सेनेने दावा केला आहे. अनिल गोटे आता भाजपत नसल्याने ही जागाही आम्हाला हवी, असाही सेनेचा आग्रह होता. प्रत्येक विभागात आम्हाला स्वतंत्र अस्तित्व हवे असे सेनेने नमूद केले. युवासेनेलाही काही जागांवर आपले अस्तित्व दाखवायचे आहे. बाहेरून आलेल्या उमेदवारांऐवजी जागा त्या पक्षाला हव्यात असा आग्रह आज सुरू होता. भाजपने 120 च्या वर एकही जागा देणार नाही अशी भूमिका प्रारंभी घेतली असताना शिवसेनेने प्रचंड घासाघीस करत 130 मतदारसंघांची मागणी लावून धरली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यामार्फत आज सकाळपासून मातोश्रीत उद्‌धव ठाकरेंशी संपर्क ठेवत जागावाटप अंतिम टप्प्यापर्यंत नेले. युतीची आकडेमोड नक्‍की करण्यासाठी केवळ आजचाच दिवस असल्याचे दोन्ही पक्षांनी ठरवले होते. सेनेने या वेळी भाजपकडे असलेल्या मतदारसंघांपैकी एकही जागा मागू नये अन्यथा युती होणे शक्‍य नाही असे कळवल्यानंतर अखेर `मातोश्री`ने नमते घेतले. मात्र भाजपने ज्या मतदारसंघात सेनेने आधी लढत दिली होती तेथे बाहेरून उमेदवार आणले आहेत, ते मतदारसंघ आम्ही कसे सोडणार असा प्रश्‍न करीत सेनेने आज अखेरपर्यंत आपले मतदारसंघ देण्यास नकार दिला होता. अखेर भाजप यासंबंधात कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही हे लक्षात आल्यानंतर सेनेने पडते घेतल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com