देवेंद्र फडणवीसांच्या 'मेगा रोड शो'मध्ये 70 हजारांचा सहभाग

भारतीय जनता पक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मेगा रोड शो' बुधवारी येथे होणार आहे. याद्वारे महाजनादेश यात्रेचा समोराप होईल. या रोड शो मध्ये सत्तर हजार नागरीक व बारा हजार दुचाकीस्वार सहभागी होतील असा दावा करण्यात आला आहे. या रोड शोच्या तयारीत पक्षाच्या नेत्यांनी झोकून देऊन काम सुरु केले आहे.
Devendra Phadanavis
Devendra Phadanavis

नाशिक : भारतीय जनता पक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मेगा रोड शो' बुधवारी येथे होणार आहे. याद्वारे महाजनादेश यात्रेचा समोराप होईल. या रोड शो मध्ये सत्तर हजार नागरीक व बारा हजार दुचाकीस्वार सहभागी होतील असा दावा करण्यात आला आहे. या रोड शोच्या तयारीत पक्षाच्या नेत्यांनी झोकून देऊन काम सुरु केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगूल या रोड शो द्वारे वाजवला जाईल. त्यापाठोपाठ गुरुवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होईल. या सभेतून राज्याच्या निवडणुकीसाठी राजकीय घोषणापत्राचीच उजळणी होईल. त्याद्वारे निवडणुकीचे रणशिंगे फुंकले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाथर्डी फाटा ते त्र्यंबक नाका या मार्गावरील मोटारसायकल रॅलीत बारा हजार, तर त्र्यंबकनाका ते पंचवटी कारंजा या मार्गावरील रोड-शोमध्ये 70 हजार जणांचा सहभाग राहील, अशी तयारी भाजपतर्फे करण्यात आली आहे. 

भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यालयात निवडणुकीच्या कार्यक्रमांच्या तयारीची आढावा बैठक झाली. यावेळी पुराणिक म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकला होत असून केवळ नाशिकचेच नव्हे, तर राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघाचे प्रतिबिंब त्याद्वारे उमटले जाईल. त्या निमित्तच्या मोटारसायकल रॅली आणि रोड-शो मध्ये मोठा जनसागर सहभागी होईल याचे प्रयत्न करावेत. शिस्तबद्धतेच्या जोडीला रोड-शोमध्ये महिलांची उपस्थिती अधिक असावी, असा प्रयत्न आहे. तसेच या कार्यक्रमातून सामान्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे.''

यावेळी विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल, लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, संभाजी मोरुस्कर, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com