भाजपचा संघटनात्मक निवडणूक कार्यक्रम संपला...आता चंद्रकांतदादा नियुक्त्या करणार

...
भाजपचा संघटनात्मक निवडणूक कार्यक्रम संपला...आता चंद्रकांतदादा नियुक्त्या करणार

नंदुरबार : भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षासह, शहराध्यक्ष व तालुकाध्यांची निवडणुक प्रक्रीया ही आता रदद झाली असुन आता भाजप जिल्हाध्यक्षांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्फत केली जाणार आहे.

भाजपच्या निवडणूक प्रक्रीयेमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हाध्यक्षाच्या निवडणुक कार्यक्रम पार पाडला. नंदुरबार जिल्हयात मात्र जिल्हा परीषद निवडणुकीच्या अनुषंघाने जिल्हाध्यक्षसह, शहराध्यक्ष व तालुकाध्यांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. पक्षाने जिल्हापरीषद निवडणुक लक्षात घेता संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला होता.

जिल्हा परीषद निवडणूक संपल्यानंतर विदयमान जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी नंदुरबार जिल्हयातील, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगांव, नवापुर, नंदुरबार या तालुक्यांचा बैठका घेऊन संघटनात्मक निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती दिली होती. तोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षापासून ते प्रदेशाध्यक्षपर्यंत सर्व नेमणुका पूर्ण झाल्या. राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पुढील निवडणुकीचा कुठलाही कार्यक्रम संघटनेच्या कार्यप्रणाली प्रमाणे होत नसतो. त्या अनुषंघाने चंद्रकांत पाटील यांची राज्य अधिवेशनापूर्वी नियुक्ती झाली.

त्याच पद्धतीने आगामी काळात नंदुरबार भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आता पक्षाच्या वरीष्ठ पातळीवरुनच नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हाध्यक्षाची नियुक्ती झाल्यानंतर शहर व तालुका अध्यक्षांच्या निवडीचा अधिकार हा जिल्हाध्यक्षांचा अधिकार असेल. शहर व तालुकाअध्यक्ष, आघाडयांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या हे संभाव्य जिल्हाध्यक्ष करतील.

नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदाकरीता विदयमान जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, डॉ.शशिकांत वाणी, नागेश पाडवी यांच्यापैकी एकाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी अल्पशा काळात अत्यंत प्रभावीपणाने संघटन उभे करण्याचे काम केले. त्यांच्या काळात विधानसभा, जिल्हापरीषद निवडणुका देखील आल्या. संघटन पर्व, सदस्य नोंदणी अभियान, रक्षाबंधन पर्व यात त्यांनी काम करुन दाखविले. त्यामुळे आगामी काळात विजय चौधरी हेच जिल्हाध्यक्ष म्हणुन नियुक्त केले जातील असे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com