भाजपच्या निवडणूक प्रचाराच्या घोषणेत पुन्हा शिवरायांचेच स्मरण...

  भाजपच्या निवडणूक प्रचाराच्या घोषणेत पुन्हा शिवरायांचेच स्मरण...

मुंबई : " छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ ' ही घोषणा देऊन गेल्या वेळच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले होते. त्यानंतर या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीसाठी "शिवरायांचा विचार तोच आमचा आचार, पुन्हा आणूया आपले सरकार' ही घोषणा घेऊन भाजप मैदानात उतरणार आहे. 

दोन दशकांहून अधिक काळ असलेली शिवसेना - भाजपची युती 2014 मध्ये तुटली. युती तुटल्यावरच भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन शिवसेनेला शह दिला होता. शिवाजी महाराजांना सर्वप्रथम शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकरणात आणले.1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तेव्हा ती "शिवशाही' असल्याचा उल्लेख शिवसेनेकडून वारंवार केला जात होता. तसेच विधानसभेवर भगवा फडकवण्याचे आवाहनही केले जाते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शाहू फुले आंबेडकर यांचा नेहमीच उल्लेख होतो. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यावर "दिल्लीत नरेंद्र व राज्यात देवेंद्र अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा मुख्यमंत्री बनण्यच्या स्पर्धेत भाजपच्या नेत्यांनी ही घोषणा हसण्यावारी नेली होती. मात्र, प्रत्यक्षात घोषणा खरी ठरली. आमागी निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पारडे जड असून केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहे. मात्र या वेळी देवेंद्र फडणवीस नावाचा उल्लेख भाजपच्या घोषणेत राहाणार नाही. यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच भाजप निवडणूक लढवणार आहे. या वेळी तर भाजपने पंतप्रधान मोदी यांच्याही नावाचा समावेश केलेला नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com