नाशिक मध्य मतदारसंघातून भाजपच्या देवयानी फरांदे विजयी

नाशिक मध्य मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे 28 हजार 133 मताधिक्‍याने विजयी झाल्या. त्यांनी कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांचा पराभव केला. विरोधकांच्या विभागणीमुळे ही निवडणूक अपेक्षेप्रमाणे फरांदे यांनी एकहाती जिंकली.
Devyani Farande Keeps Nashik East Seat
Devyani Farande Keeps Nashik East Seat

नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे 28 हजार 133 मताधिक्‍याने विजयी झाल्या. त्यांनी कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांचा पराभव केला. विरोधकांच्या विभागणीमुळे ही निवडणूक अपेक्षेप्रमाणे फरांदे यांनी एकहाती जिंकली.

देवयानी फरांदे यांना 73 हजार 099, कॉंग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांना 44 हजार 996, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन भोसले 22 हजार 042 मते मिळाली. 1 लाख 54 हजार 623 मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये 85 हजार 59 पुरुष तर 69 हजार 564 महिला मतदारांनी मतदानाच हक्क बजावला. या मतदारसंघात मतमोजणीच्या बावीस फेऱ्या झाल्या. त्यात पहिल्या फेरीपासून भाजपच्या फरांदे आघाडीवर होत्या. 

हा मतदारसंघ शहराच्या मध्यवर्ती भागाचा असल्याने प्रारंभपासूनच त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथे माजी आमदार नितीन भोसले यांना उमेदवारी दिली होती. राज ठाकरे यांनी येथे सभा घेतली. कॉंग्रेसने येथे नगरसेवक शाहू खैरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मनसेचे भोसले यांच्याशी त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध असल्याने त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे ऐनवेळी नगरसेविका डॉ. पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांनी कोणतिही तयारी नसतांना चांगली लढत दिली. फरांदे मात्र पुर्ण तयारीनिशी निवडणुकीत उतरल्या होत्या. त्यात अपेक्षेप्रमाणे विजयी होत त्यांनी भाजपची जागा राखली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com