bjp devegauda news about seprate karnataka | Sarkarnama

भाजपच्या चिथावणीला  बळी पडू नका : देवेगौडा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : कर्नाटकचे विभाजन करण्याच्या कोणत्याही हालचालीला विरोध दर्शविताना माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनी आज भाजपच्या चिथावणीला बळी पडू नका, असे आवाहन उत्तर कर्नाटकमधील लोकांना केले. 

वेगळ्या राज्याची मागणी माझ्या किंवा माझा मुलगा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या काळात कधीही पूर्ण होणार नाही, अशी ग्वाहीही देवेगौडा यांनी दिली. उत्तर कर्नाटक प्रत्येक राज्य होराता समितीने 13 जिल्ह्यांत एक दिवसाच्या बंदचे आवाहन केल्याच्या पार्श्‍वभूमीवर देवेगौडा यांनी आपले मत व्यक्त केले. ही समिती कर्नाटकच्या उत्तर भागात वेगळ्या राज्याची मागणी करत आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकला निधी देण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे सांगून देवेगौडा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा वाईट प्रचाराद्वारे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, की येडियुरप्पांची चिथावणी योग्य सिद्ध होणार नाही. आम्ही यासाठी काळजी घेऊ. जर काही लोक वेगळ्या उत्तर कर्नाटकची मागणी करत असतील, तर मी त्यांना सांगू इच्छितो, की मी किंवा कुमारस्वामी यांच्या आयुष्यात हे कधीच घडणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख