परभणीत आमदार पाटील यांनी गद्दारी केली ; त्यांची जागा भाजपला द्या : भरोसे  

शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी गद्दारी करत युतीचा उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता विधानसभेला शिवसेनेचे लोक कोणत्या तोंडाने जनतेकडे मत मागणार आहेत ? -आनंद भरोसे, महानगराध्यक्ष ,भाजप
Bharose-jadhav-patil.
Bharose-jadhav-patil.

परभणी :  परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहूल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत स्वपक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचे प्रयत्न करून त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली , असा  आरोप भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी गुरुवारी केला.

या विधानसभेत सातत्याने शिवसेनेचे मताधिक्य घटत असल्याने ही जागा भाजपला मिळावी अशी आम्ही मागणी करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

 लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी भाजपचे पदाधिकारी व  कार्यकर्ते समोर होते. परंतू शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी गद्दारी करत युतीचा उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आता विधानसभेला शिवसेनेचे लोक कोणत्या तोंडाने जनतेकडे मत मागणार आहेत असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.

परभणी महापालिकेत शिवसेनेपेक्षा आमच्या नगरसेवक जास्त आहेत.  जिल्हा परिषदेमध्ये ही आम्ही समसमान आहोत. हा सगळा आधार घेवून आम्ही प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्याची भेट घेणार असल्याचे आनंद भरोसे यांनी सांगितले.  

परभणी विधानसभा मतदार संघात गेल्या 25  वर्षापासून शिवसेनेचा आमदार आहे. परंतू याच लोकसभा निवडणुकीत याच विधानसभेत शिवसेनेचा उमेदवार सातत्याने पिछाडीवर पडत आहे. त्यामुळे या विधानसभेत शिवसेना लोक कंटाळले आहेत असा दावा आनंद भरोसे यांनी केला. गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी परभणी जिल्ह्यातील विकास कामांना दिला आहे. या कामाचा लेखा जोखा भरोसे यांनी मांडला. 

ते म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत मी भाजपकडून परभणी विधानसभा निवडणुक लढविली होती. यात मला 43 हजार 500 मते होती. ही मते भाजपची आहेत हे आता सिध्द झाले आहे. त्यानंतर गेल्या साडेचार वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी 33 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून या मतदार संघात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत रस्त्याची कामे होत आहेत. परंतू त्याचे श्रेय लाटण्याचे काम केले जात असल्याचा टोला ही त्यांनी आमदार डॉ. राहूल पाटील यांचे नाव न घेता लगावला.

 परभणी जिल्ह्यात भाजपचे बुथ निहाय संघटन पक्के आहे. त्याच बरोबर या मतदार संघातील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकासदृष्टीला मतदान केले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परभणीच्या जागेवर भाजपचा उमेदवार द्यावा अशी आमची सर्वाची मागणी आहे. या साठी जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेतली. त्यात रचना आखली आहे असेही ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com