अशिष शेलारांकडे पक्षाची आणखी एक जबाबदारी

राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असतानादेखील शेलार यांच्याकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या.
BJP delegates another responsibility to Ashish Shelar
BJP delegates another responsibility to Ashish Shelar

पुणे : भारतीय जनता पार्टीचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद म्हणून अशिष शेलार यांची तर आमदार देवयानी फरांदे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असतानादेखील शेलार यांच्याकडे महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. सत्तेतील पाच वर्षांच्या शेवटच्या टप्प्यात शेलार यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले होते. पक्षाचा मुंबईतील प्रमुख चेहरा ही त्यांची ओळख आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्याकडेच मुख्य जबाबदारी होती. 


गेल्या काही वर्षात पक्षाने विनोद तावडे यांच्याकडून मुंबईची जबाबदारी हळूहळू शेलार यांच्याकडे सोपविली आहे. मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला कायम टार्गेट करणाऱ्या शेलार यांच्याकडे आता नव्या संदर्भाने मुंबईची विशेष जबाबदारी दिली जाण्याची शक्ता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला अडीच वर्षांचा वेळ आहे. या काळात पक्षाची संघटना अधिक मजबूत करून येत्या निवडणुकीत महापालिकेत सत्ता आणण्याची तयारी पक्षाने सुरू केली असून त्याची मुख्य जबाबदारी शेलार यांच्यावर राहणार आहे. 


राज्यातील सत्ता गेल्यानंतरही विधी मंडळ कामकाजात शेलार यांच्याकडे मुख्य प्रतोदच्या निमित्ताने महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून सुजीतसिंह ठाकुर यांच्याकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. आज किंवा उद्या तशी घोषणा होण्याची शक्‍यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. फडणवीस, शेलार, ठाकूर यांच्या रूपाने पक्ष तरूण आणि सक्षम अशा नव्या फळीकडे पक्षाची संपूर्ण धुरा सोपवताना दिसत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com