Bjp Declares Fourth List Khadse Tawde Bawankule Names Not There | Sarkarnama

चवथ्या यादीतही एकनाथ खडसे, तावडे, बावनकुळे नाहीत; मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

भारतीय जनता पक्षाने आपली विधानसभा निवडणुकांसाठी आपली चवथी यादी जाहीर केली. या यादीतही एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे हे नाराज पुढे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. खडसेंच्य जागी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाने आपली विधानसभा निवडणुकांसाठी आपली चवथी यादी जाहीर केली. या यादीतही एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना स्थान मिळालेले नाही. त्यामुळे हे नाराज पुढे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. खडसेंच्य जागी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

भाजपने प्रकाश मेहता, राज पुरोहित, बाळासाहेब सानप यांचाही पत्ता कट केल्याचे या यादीतून दिसून येत आहे. भाजपने आतापर्यंत उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. यापैकी एकातरी यादीत आपलं नाव असेल अशी या हेवीवेट नेत्यांना आशा होती. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. बोरीवलीमधून विनोद तावडेंच्या जागी सुनील राणे, नाशिक पूर्वमध्ये बाळासाहेब सानपांच्या जागी राहुल ढिकले, घाटकोपर पूर्वमध्ये प्रकाश महेतांच्या ऐवजी पराग शहा यांना उमेदवारी मिळाली आहे. कुलाब्यात राज पुरोहित यांच्या जागी राहुल नार्वेकर यांना तिकीट देण्यात आले आहे.बावनकुळे यांच्या बाबतचा सस्पेन्स मात्र कायम आहे.

चवथ्या यादीतले उमेदवार असे- 
कुलाबा - राहुल नार्वेकर
घाटकोपर पूर्व- पराग शहा
मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
काटोल - चरणसिंग ठाकूर
तुमसर - प्रदीप पाडोळे
नाशिक पूर्व - राहुल ढिकले
बोरिवरी - सुनील राणे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख