भाजप एक धोका है; देश बचालो मोका है : शिवसेनेचा हल्लाबोल

भाजप एक धोका है; देश बचालो मोका है : शिवसेनेचा हल्लाबोल

पुणे : गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, दूध, साखर, तेलाची अशा जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ केंद्र आणि राज्यसरकारच्या विरोधात मंगळवारी शिवसेनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत "लाटणे मोर्चा' काढण्यात आला.

या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. "महागाई वाढली बुलेट ट्रेन च्या वेगाने, कधी येणार अच्छे दिन, "भाजप एक धोका है, देश बचालो मौका है,' "पेट्रोल भाज्यांनी रडवले रे अच्छे दिन आणणाऱ्यानी फसवले,' "एवढी लाटणे कशाला, भाजपला ठोकायला,' अशा भाजपविरोधात घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.

 "महागाईचा भस्मासुर'असा वेश परिधान केलेला शिवसैनिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच महिलांनी महागाईवरील पथनाट्य देखील सादर केले. तसेच बैलगाडीवर अन्नधान्य, सिलिंडर आणि तेलाचे डबे घेऊन कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. 

याप्रसंगी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख उदय सामंत, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, शहराध्यक्ष विनायक निम्हण, सेनेचे पालिकेतील गटनेते संजय भोसले, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, शहर संघटक श्‍याम देशपांडे, बाबा धुमाळ, दत्ता टेमगिरे, महिला आघाडीच्या तृष्णा विश्वासराव, निर्मला केंडे, कीर्ती फाटक, नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, संजय मोरे, युवा सेनेचे किरण साळी आदी उपस्थित होते.

दरम्यान, या मोर्चासाठी मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात होता. साधू वासवानी चौक, विधानभवन चौक येथे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. 

""युतीच्या गतकाळच्या सरकारमध्ये जीवनावश्‍यक वस्तू वरील दर स्थिर ठेवण्यात आले होते. परंतु भाजपप्रणीत केंद्र सरकार यामध्ये अपयशी ठरले आहे. दिवसें दिवस पेट्रोल,डिझेल आणि गॅस च्या दरामध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे 
सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. वाढत्या महागाई आणि सरकारविरोधात हा सर्वसामान्यांचा आक्रोश आहे, सत्तेत जरी असलो तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरत राहणार, असे मत उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी शिष्टमंडळाकडून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com