आव्हाडांना काळजी सामान्यांची नाही; ते तर बिल्डरांचे पाठीराखे : भाजपची टीका

...
आव्हाडांना काळजी सामान्यांची नाही; ते तर बिल्डरांचे पाठीराखे : भाजपची टीका

पुणे : झोपडपट्टी पुर्नवसन योजनेअंतर्गत (एसआरए) होणाऱ्या बांधकामांना चटई निर्देशांक (एफएसआय) मोफत देण्याची घोषणा करण्याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तसेच सचिव डॉ नितीन करीर यांच्याशी चर्चा केली आहे का, असा प्रश्‍न भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील नेते उज्ज्वल केसकर यांनी केला आहे. पुरेशी माहिती असूनही आव्हाड या माध्यमातून बिल्डरांचा फायदा करून देत आहेत, अशी टीका केसकर यांनी केली आहे.

"एसआरए'च्या विकसकांना मोफत "एफएसआय' दिल्यास त्यातून टीडीआर निर्माण होईल. त्यातून बिल्डर लॉबीचाच फायदा होणार आहे याची आव्हाड यांना जाणीव आहे. स्वत: बिल्डर असल्याने त्यांना सर्व गोष्टींची कल्पना आहे. मात्र, बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी ते हे करीत आहेत का, असा प्रश्‍न केसकर यांनी उपस्थित केला आहे.

मुळात हा संपूर्ण विषय नगरविकास खात्याशी संबंधित आहे. गृहनिर्माण विभाग म्हणून यातील काहीही करायचे असेल तर नगरविकास विभागाची आधी परवानगी लागणार आहे. मात्र, केवळ लोकप्रिय घोषणा आणि बिल्डर लॉबीचा फायदा करण्याच्या नादात आव्हाड चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालत आहेत, असा आरोप केसकर यांनी केला आहे. केसकर हे पुणे महापालिकेतील भाजपाचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. शहर रचना, विकास आराखडा व या संदर्भातील कायद्यांचा त्यांचा चांगला अभ्यास आहे.  आव्हाड यांनी वेळ दिल्यास पुणे झोपडपट्टीमुक्त कसे करता येईल याविषयी सादरीकरण करण्याची तयारी असल्याचे केसकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com