भाजप नगरसेवकांना सावंतवाडीत नारायण राणेंचे आदरातिथ्य

महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या दहा नगरसेवकांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे काल भाजपच्या नगरसेवकांना पुणे येथून सावंतवाडीला हलविण्यात आले आहे. आता खुद्द माजी मंत्री गिरीश महाजन नगरसेवकांसोबत मुक्कामाला आहेत. नारायण राणे यांच्याच हॉटेलमध्ये नगरसेवकांचे आदरातिथ्य होत आहे.
Maharashtra Ex Cm Narayan Rane
Maharashtra Ex Cm Narayan Rane

नाशिक : महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या दहा नगरसेवकांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे काल भाजपच्या नगरसेवकांना पुणे येथून सावंतवाडीला हलविण्यात आले आहे. आता खुद्द माजी मंत्री गिरीश महाजन नगरसेवकांसोबत मुक्कामाला आहेत. नारायण राणे यांच्याच हॉटेलमध्ये नगरसेवकांचे आदरातिथ्य होत आहे.

दहा नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. अशा स्थितीत महापौरपदाचा उमेदवार निश्‍चित केल्यास आणखी दगा फटका नको यासाठी पक्षाचे नेते दक्ष आहेत. त्यामुळेच उमेदवार ठरविण्यासाठी विलंब होत आहे. निवडणुक जवळ येऊ लागल्याने स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपने निश्‍चित होण्याऐवजी काळजीचे वातावरण आहे. हे चित्र बदलवण्यासाठी स्वतः गिरीश महाजन भुमिका बजावणार आहेत. कोणत्याही स्थितीत भाजपचाच महापौर होईल असा विश्‍वास ते प्रत्येक नगरसेवकाला देत आहेत.

महापालिकेतील भाजपचे दहा नगरसेवक संपर्कात नाहीत. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीत तोडग्यासाठी राज्याच्या सत्ताकारणात गुंतलेले माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपचे संघटनमंत्री किशोर काळकर नाशिक महापौरपदाच्या राजकारणात उतरले आहेत. श्री. काळकर शनिवारपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. महाजन सावंतवाडी येथे पोचलेल्या भाजप नगरसेवकांच्या कॅम्पमध्ये आहेत. येत्या 22 नोव्हेंबरला महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर गिरीश महाजन यांनी उमेदवारी न दिल्याने शिवसेनेते गेलेले भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा करिश्‍मा व उपद्रवमुल्याने आता भाजपची झोप उडाली आहे. सानप समर्थक नगरसेवक संपर्कात आल्याने, तसेच राज्यात शिवसेना, कॉंग्रेस राष्ट्रवादी, कॉंग्रेस यांची एकत्रित महाशिवआघाडीचे नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येत असल्याने तोच ट्रेंड नाशिक महापालिकेत निर्माण होऊ शकतो. या शक्‍यतेने भाजपला सत्तेपासून सहज रोखता येणे शक्‍य असल्याचा विश्‍वास शिवसेनेला निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com