पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगची अफवाच! महापौर निवडीबाबत भाजप निर्धास्त

भाजपचा एक गट अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीत इनकमिंगची अफवाच! महापौर निवडीबाबत भाजप निर्धास्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या ३७ नगरसेवकांचा गट महापौर निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीत जाणार असल्याची पोष्ट सोशल मिडियात फिरली आणि शहरात मोठी खळबळ उडाली. मात्र, चुकीच्या टायमिंगचा हा पक्षप्रवेश ही अफवाच असल्याचे कळले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

राज्यात सत्ता स्थापनेची लगीनघाई सुरु असताना हा प्रवेश तूर्त शक्य नाही, असे राष्ट्रवादीच्या शहरातील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र,राज्यात महाशिवआघाडीव्दारे राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार असल्याचे टायमिंग साधून ही पोष्ट फिरल्याने मोठी खळबळ उडाली. चर्चा झाली.

लोकसभ निवडणुकीपासूनच ७७ पैकी २५ भाजप नगरसेवकांचा गट अजित पवारांच्या संपर्कात असल्याने भविष्यात कधीही हे इनकमिंग होऊ शकते,याला राष्ट्रवादीतील दुसऱ्या पदाधिकाऱ्याने,मात्र दुजोरा दिला .त्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक नगरसेवक आहेत,असे तो म्हणाला.

गाववाल्यांना न्याय मिळत नसल्याने ते पक्षांतरांच्या तयारीत असल्याची माहिती त्याने दिली. मात्र, एक तृतीयांश संख्याबळाअभावी त्यातून पोटनिवडणुक लागणार असल्याने लोकसभेच्या धामधुमीत अजित पवारांनी त्याबाबत `वेट अॅन्ड वॉच`ची भूमिका घेतली होती. दरम्यान,विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होऊ लागले आहे. त्यामुळे या पक्षांतराने सोशल मिडियात पुन्हा उचल खाल्ली. आता १७ नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झालेला आहे. शरद पवारांविषयी अनुकूल वातावरण आहे. परिणामी पक्षांतराचे हे टायमिंग पुन्हा चुकीचे ठरते आहे. तसेच त्यातून पोटनिवडणुक घ्यायला लागू नये, अशी अजितदादांची भूमिका कायम असल्याने तूर्त,तरी हे इनकमिंग रखडले असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सोमवारी सांगण्यात आले.

त्यामुळे २२ तारखेला होणारी महापौरपदाची निवडणूक पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने विनाअडथळा पार पडणार आहे.मात्र भविष्यात पक्षांतर होण्याची टांगती तलवार त्यांच्या मानेवर लटकलेलीच राहणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते,असे म्हणतात. गत पालिका निवडणुकीच्या तोंडावर २०१७ ला राष्ट्रवादीतील नगरसेवकांचा मोठा गट भाजपमध्ये गेला. त्यांच्या जोरावरच प्रथमच पालिकेत भाजपची सत्ता आली. आता पुन्हा भाजपमधील नगरसेवकांचा असा मोठा गट घरवापसी करतो का हे आगामी पालिका निवडणुकीपूर्वीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान,या घडामोडींबाबत माहिती नसल्याचे सांगत भाजपच्या गोटातून बोलण्यास अधिकृतपणे नकार दिला गेला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com