शिवसेनेचा महापौर पदाचा अर्ज भरताना नाशिक भाजपचा 'नाॅट रिचेबल' नगरसेवक हजर! (व्हिडिओ)

महापौर पदासाठी आज भाजपच्या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, यावेळी शिवसेनेतर्फे चार जणांनी अर्ज दाखल करतांना भाजपचे नगरसेवक कमलेश बोडके देखील उपस्थित राहिले. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
We Have Support of Forteen BJP Corporators Claims Nashik Shivsena
We Have Support of Forteen BJP Corporators Claims Nashik Shivsena

नाशिक : महापौर पदासाठी आज भाजपच्या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, यावेळी शिवसेनेतर्फे चार जणांनी अर्ज दाखल करतांना भाजपचे नगरसेवक कमलेश बोडके देखील उपस्थित राहिले. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे चौदा नगरसेवक आमच्या सोबत असून पुरेसे संख्याबळ असल्याने शिवसेनेचाच महापौर होईल, असा विश्‍वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे "राज्यातील बदललेले राजकीय समीकरणे पाहता काही नगरसेवक आमच्यापासून दुरावले आहेत. ते सत्तेकडे गेले आहेत. मात्र, वेळेवर ते आमच्यासोबत आलेले दिसतील. सगळ्यांना व्हीप बजावण्यात येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्हाला पाठींब्याचे आश्‍वासन दिलेले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होण्यात काहीही अडचण येणार नाही,'' असा विश्‍वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनिल बागुल यांनी व्यक्त केला.

महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी दोनपर्यंतची वेळ होती. यावेळी भाजपतर्फे महापौरपदासाठी सतीश कुलकर्णी, शशिकांत जाधव, दिनकर आढाव यांनी तर उपमहापौरपदासाठी गणेश गिते, अलका आहिरे, अरुण पवार, भिकुबाई बागुल यांनी अर्ज दाखल केले. यावेळी जुने वाद विसरुन सर्वांनी एकत्रीतपणे अर्ज दाखल करण्याच्या सुचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हे सर्व नेते एकत्रीतपणे अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. 

मात्र, त्यानंतर शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी महापौर विनायक पांडे, नुकतेच भाजपकडून शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह भाजपचे नॉट रिचेबल नगरसेवक कमलेश बोडके यांच्या उपस्थितीत अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, विलसा शिंदे या चौघांनी अर्ज दाखल करीत विजयाची खुन करुन आमचे संख्याबळ जमले आहे. त्यामुळे शिवसेनेचाच महापौर होईल असा दावा केला. भाजपचे चौदा नगरसेवक आणच्या संपर्कात आहेत असा दावाही त्यांनी केला. दोन दिवसांनी होणाऱ्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीविषयीची उत्सुकता व राजकीय घडोमोडी आणखी ताणल्या गेल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com