भाजप नगरसेविका सुप्रिया खोडेंकडून गरजुंना ४५ पोती गहू वाटप

कोरोनाच्या संकटात लॉक डाऊन'मुळे प्रभाग क्रमांक तीस मधील वडाळा आणि आसपासच्या भागातील रोजंदारीवर पोट भरणाऱ्या कुटुंबांसाठी भाजपच्या स्थानिक नगरसेविका सुप्रिया खोडे यांनी स्वखर्चातून तब्बल ४५ क्विंटल गव्हाचे वाटप केले
BJP Corporator From Nashik Supriya Khode Gave Wheat to Needy
BJP Corporator From Nashik Supriya Khode Gave Wheat to Needy

नाशिक  : 'कोरोना'च्या संकटात लॉक डाऊन'मुळे प्रभाग क्रमांक तीस मधील वडाळा आणि आसपासच्या भागातील रोजंदारीवर पोट भरणाऱ्या  कुटुंबांसाठी भाजपच्या स्थानिक नगरसेविका सुप्रिया खोडे यांनी स्वखर्चातून तब्बल ४५ क्विंटल गव्हाचे वाटप केले. 

अत्यंत बारकाईने जी कुटुंबीय खऱ्या अर्थाने गरजू आहेत अशा एक हजार कुटुंबांची यादी करून त्यांना या गव्हाचे वाटप करण्यात आले .नगरसेविका खोडे यांचे पती माजी नगरसेवक सुनिल खोडे आणि भाजप च्या द्वारका मंडळ चे अध्यक्ष सुनिल देसाई, स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सिन्नर तालुक्यातील बारगाव पिंपरी येथील दशरथ उगले आणि इतर दोन शेतकऱ्यांकडून हा गहू आणण्यात आला. या गव्हाची राजू शेख, सुषमा शिरसाठ, अलका शिरसाठ, संकेत खोडे, हर्षद खोडे, भारती वायल, भास्कर कोकणे आदींच्या मदतीने खोडे मळा येथे साफसफाई करण्यात आली. हे  गहू निवडून, काळजीने साफ करण्यात आले. त्यानंतर छोट्या पिशव्यांमध्ये हा गहू भरण्यात आला.

दरम्यानच्या काळात वडाळागाव, कोळीवाडा, रामोशी वाडा, गणेश नगर, राजीव नगर वसाहत, मेहबूबनगर, घरकुल योजना ,अण्णाभाऊ साठे नगर,  सावित्रीबाई फुले वसाहत या भागात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांची यादी करण्यात आली. त्यानंतर त्या त्या ठिकाणी जाऊन या कुटुंबांना ह्या गव्हाचे वाटप करण्यात आले. सलग तीन दिवस काटेकोरपणे नियोजन करून हा गहू गरजुंपर्यंत पोहोचल्याने किमान पंधरा दिवसांचा या कुटुंबांचा भाकरीचा प्रश्न सुटला आहे. 

नगरसेविका खोडे यांनी  उचललेल्या या समाजसेवी पावलाचे परिसरात कौतुक केले जात आहे. प्रतिक्रिया- सुप्रिया खोडे (नगरसेविका,प्रभाग 30) स्थानिक असल्याने हातावर असणारे प्रत्येक कुटुंब मला माहित आहे. अनेक दिवसांपासून हाताला कामच नसल्याने या कुुटुंबांचे हाल होत होते.मात्र योग्य त्या कुटुंबापर्यंत धान्य पोचणे गरजेचे होते .त्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करून ते पोचवण्यात यश आल्याने खऱ्या अर्थाने उपक्रमाचे सार्थक झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com