मनसेने साड्यावाटप बंद करून दाखवावे : भाजप नगरसेवकांचे आव्हान

साडीवाटपावरून कोथरूड आले राज्यात चर्चेत!
मनसेने साड्यावाटप बंद करून दाखवावे : भाजप नगरसेवकांचे आव्हान

पुणे : भाऊबीजेच्या निमित्ताने कोथरूडमधील गरिब महिलांना साड्यावाटप करण्यात येत आहे. या साड्यांची संख्या लाखभर नसून केवळ दहा हजार आहे. याचा निवडणुकीशी संबंध नाही, असा खुलासा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. दुसरीकडे भाजप नगरसेवकही आक्रमक झाले असून या उपक्रमाला विरोध करणाऱ्यांनी तो बंद पाडण्यासाठी पुढे यावेच, असे आव्हान दिले आहे. 

कोथरूडमध्ये साडीवाटप प्रकरणावरून सध्या वातावरण पेटले आहे. मनसेने या साडीवाटपाला विरोध केला आहे. त्यावर बोलताना पाटील यांनी म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मीपूजना निमित्त महिलांचा सन्मान करण्याचे सांगितले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डबेवाल्यांना दिवाळीनिमित्त भेट दिली आहे. मी माझ्या वाढदिवसाला दुष्काळग्रस्त भागातील मुलांना शाळेचे गणवेशासाठी कापड देण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी दहा हजार मुलींना त्यातून मदत झाली होती.

आता दिवाळीनिमित्त गरिब महिलांना साडी देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दहा हजार साड्या वाटप होणार आहेत. गरिब महिलांना त्या निवडणुकीनंतर देण्यात येत आहेत. त्यामुळे त्याचा निवडणुकीशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

नगरसेवक अमोल बालवडकर आणि किरण दगडे या दोघांनी पाटील यांच्या साड्या आपल्या प्रभागात वाटल्या. मनसेने हे साडीवाटप बंद करून दाखवावे, असे आव्हान दगडे यांनी दिले. ते म्हणाले, ``मी माझ्या प्रभागात गरिबांना दर वर्षी दिवाळी सरंजाम देत असतो. त्यासोबतच या साड्या दिल्या आहेत. मनसे स्वतः काही करत नाही आणि इतरांनी केलेल्या चांगल्या कामावर विनाकारण टीका करते. गरिबांना साड्या मिळत असतील आणि मनसेचे लोक तेथे येतील तर या महिलाच त्यांना विरोध करतील.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com