तुम्हाला उमेदवारी नाही पण तुम्ही सुचवाल त्याला देऊ, भाजपचा खडसेंना निरोप 

eknath khadse
eknath khadse

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले . 

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भापच्या वरिष्ठ नेत्यांनी असा निरोप पाठविला आहे की ,  तुम्हाला उमेदवारी देणे शक्य नाही पण तुम्ही सुचवलेले नाव उमेदवार असेल. खडसेंना हा निरोप मिळालेला आहे , अशी  चर्चा आहे.

एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे या रावेरच्या भाजप खासदार आहेत . तर खडसेंच्या कन्या ऍड . रोहिणी खडसे खेवलकर यांना बुलडाण्यातून निवडणूक लढविण्याचा आग्रह भाजपकडून केला जात आहे . 

मला कुटुंबिय आणि कार्यकर्त्यांशी बोलू द्या असे एकनाथ खडसे यांनी सांगितल्याचीही चर्चा होती.  

चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी ऐवजी काटोल या मतदारसंघात अनिल देशमुख यांच्या विरोधात लढवले जाण्याची शक्यता आहे. कामठीत दलित नेत्या सुलेखा कुंभारे यांना संधी दिली जाईल असे सांगन्याय येत आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com