BJP core commitee is unhappy about Shiv sena | Sarkarnama

शिवसेनेच्या भूमिकेबाबत भाजपाच्या कोअर कमिटीत नाराजी

महेश पांचाळ : सरकारनामा न्यूज ब्युरो
शुक्रवार, 24 मार्च 2017

शिवसेनेची नेहमीची कटकट दूर करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील जे आमदार भाजपामध्ये येणार असतील, तर त्यांना घेवून पक्षाची ताकद वाढवायला हरकत नाही, अशी भूमिकाही मांडण्यात आली.

मुंबई :सत्तेत असतानाही शिवसेनेच्या विरोधाभास भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत, पुढील रणनितीच्या भाजपाच्या बी प्लॅनवर गुरुवारी भाजपाच्या कोअर कमिटीत चर्चा झाली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आज दुपारी कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या मुद्दयावर 29 मार्चपासून राज्यभर संघर्षयात्रा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे, सुधीर मुनंगटीवार, गिरीष बापट आदी मंत्री उपस्थित होते. सत्तेत असताना शिवसेनेच्या विरोधाभास भुमिकेचा भाजपाला त्रास सहन करावा लागत आहे. शिवसेनेबाबत कायमस्वरुपी ठाम भूमिका घ्यायला हवी, त्यासाठी दिल्ली नेतृत्वाशी चर्चा करायला हवी, असे मतही या बैठकीत भाजपा नेत्यांनी मांडले.

मध्यावधी निवडणुका झाल्या तर काय करायचे याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. भाजपाच्या आमदारांना मध्यावधी निवडणुका नको आहेत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. मध्यावधी निवडणुका झाल्या तर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली तर काय ? असा प्रश्‍नही यावेळी उपस्थित करण्यात आल्याचे समजते. शिवसेनेची नेहमीची कटकट दूर करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतील जे आमदार भाजपामध्ये येणार असतील, तर त्यांना घेवून पक्षाची ताकद वाढवायला हरकत नाही, अशी भूमिकाही मांडण्यात आली. मध्यावधी निवडणुका झाल्या तर त्याला कसे सामोरे जायचे याबाबतही चर्चा झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. 
 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख