खडसे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे तरी ऐकतील का?

नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलेल्या एकनाथ खडसे यांनी काल केंद्रीय भाजपचा निरोप आल्यानंतर दिल्लीचे विमान लगेचच पकडल्याचे समजते. येत्या एक दोन दिवसात केंद्रीय नेते त्यांच्याशी संवाद साधणार आहेत असे समजते.
Bjp Central Leadership will try to Convince Ekanath Khadse
Bjp Central Leadership will try to Convince Ekanath Khadse

नागपूर :  फडणवीस सरकारमध्ये क्रमांक दोनचे नेते असणारे ओबीसी नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडू नये यासाठी त्यांना केंद्रीय भाजप नेत्यांनी दिल्लीला बोलावून घेतले आहे. नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलेल्या एकनाथ खडसे यांनी काल केंद्रीय भाजपचा निरोप आल्यानंतर दिल्लीचे विमान लगेचच पकडल्याचे समजते. येत्या एक दोन दिवसात केंद्रीय नेते त्यांच्याशी संवाद साधणार आहेत असे समजते.

तीन वर्षापासून सरकारमधून बाहेर पडलेल्या खडसेंना सतत अवहेलनेचा सामना करत रहावा लागला असे त्यांच्या समर्थकांचे मित्र आहे.विधानसभा निवडणुकीत मुक्‍ताईनगर मतदारसंघात खडसे यांच्या परंपरागत मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारली गेली.त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी यांना पक्षाने उमेदवारी दिली पण त्या पराभूत झाल्या.पक्षातील काही जणांनी आपल्या कन्येला जाणीवपूर्वक पाडल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.

गोपीनाथगडावरील मेळाव्यात पक्ष विरोधी स्वर आळवला गेला तेंव्हा पंकजाताई पक्ष सोडणार नसल्या तरी माझे मात्र काही नक्‍की नाही असे खडसे यांनी घोषित केले होते. नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खडसेंनी सलग दुसऱ्यांदा भेट घेतली.

खडसे यांनी शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांशी संपर्क साधला तरी कोणत्याही पक्षात प्रवेशाबददल ठोस निर्णय होवू शकलेला नाही.खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या तरी आमदारकीसाठी जागा कशी मिळेल याचाही अंदाज घेणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले. खडसे यांचा विशिष्ट खात्यासाठी आग्रह असल्याचेही सांगितले जाते. दिल्लीतील भेटीगाठी तसेच अन्य राजकीय विषयांबाबत प्रयत्न करूनही खडसेंशी संपर्क होवू शकला नाही.

पुण्याजवळील भोसरी येथे जमीन खरेदी प्रकरणावरून एकनाथ खडसे यांच्यावर केंद्रीय नेतृत्व नाराज झाल्याने त्यांना राजीनामा दयावा लागला होता असे सांगण्यात येते खडसे यांनी पक्षातील काही नेत्यांनी आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.पक्षात सत्ता गेल्यानंतर सुरू झालेली बंडाळी शमवण्यासाठी खडसेंसारख्या महत्वाच्या ओबीसी नेत्याला दिल्लीत बोलावून घेतले आहे. ओबीसी समाजाचा चेहरा असलेले, खानदेशात पक्षाची बांधणी करणारे नेते बाहेर जावू नयेत अशीपक्षाची अपेक्षा आहे की त्यांना समज देण्यासाठी बोलावण्यात आले आहे याबददल तर्कवितर्क सुरू आहेत. महाराष्ट्रात 105 जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष झालेल्या भाजपचे सरकार आले नसल्याने सध्या अस्वस्थता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com