जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा जल्लोष

जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा जल्लोष

इस्लामपुर : कर्नाटक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल उरूण-इस्लामपूर शहरात नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकत्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून विजयाच्या घोषणा देत व फटाक्‍याची अताषबाजी करत मोटरसायकल रॅली काढली.
 
नगरपरिषदेमधुन या रॅलीला सुरूवात झाली. कचेरी चौक, यल्लामा चौक, गांधी चौक, जुनी भाजी मंडई, शिराळा नाका, स्टॅन्ड रोड, आझाद चौक, संभाजी चौक, उर्दू शाळा, एम.डी.पवार बॅंक , शिवाजी चौक, उदय चौक, पाटील गल्ली, पाटील भजनी मंडप, कुंभार गल्ली, आष्टा नाका, अंबिका उद्यान, पोस्ट कार्यालय, कचेरी चौक या मार्गावरून मोटार सायकल रॅली काढून नगरपालिकेच्या परीसरात सांगता झाली . यावेळी भारतीय जनता पार्टीचा,विजयाच्या घोषणा कार्यकत्यांनी दिल्या. कर्नाटकातील भारतीय जनता पार्टीला जनतेने भरघोस यश मिळवून दिल्याने इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्‍यातील कार्यकत्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
 
यावेळी नगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले,"महाराष्ट्र राज्यासह केंद्रामध्ये भाजपाची सत्ता असून केंद्र व राज्य शासनाने जनतेचा विश्वास संपादन केला असून सर्वसामान्यापासून सर्व क्षेत्रातील लोकांच्या हिताचे निर्णय घेवून विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. विविध योजना या ग्रामीण भागांसह शहरीभागाचा सर्वांगिण विकास साधणाऱ्या आहेत. यामुळे यापुढेही भारतीय जनता पार्टीला यश मिळत राहील. यात शंका नाही.'

वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष अरविंद पाटील, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे, यदुराज थोरात, युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष प्रविण माने, गजानन फल्ले, नरेंद्र सुर्यवंशी, संतोष वळसे, माजी नगरसेवक सुभाष शिंगण, नितीन पाटील, अजित पाटील, अक्षय पाटील, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अभिजीत पाटील, नगरसेविका कोमल बनसोडे, सांगली जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष नंदकुमार कुंभार, आदीसह अन्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com