bjp candidate for uppar house in parliament | Sarkarnama

भाजपचा राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार कोण ?

उमेश घोंगडे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पुणे : राज्यसभेवरील तीन जागांवर भारतीय जनता पार्टी कुणाला संधी देणार याची चर्चा पक्ष पातळीवर सुरू झाली आहे. चर्चा सुरू असलेल्या नावांमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. उर्वरित एका जागेसाठी अनेक नावांची चर्चा असून यात विदर्भातून माजी खासदार हंसराज आहिर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, खासदार अमर साबळे व भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या नावांची चर्चा आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर उदयनराजे यांना राज्यसभेवर संधी देण्याबरोबरच केंद्रात मंत्रीपद मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. उदयनराजेंबरोबरच रामदास आठवले यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. आठवले यांना गेल्यावेळीदेखील भाजपाच्या कोट्यातून राज्यभसेवर पाठविण्यात आले होते. तिसऱ्या जागेसाठी खासदार काकडे व साबळे यांचा विचार झाला नाही तर उदयनराजे यांच्यामुळे खासदार काकडे यांना तर आठवले यांच्यामुळे खासदार साबळे यांना त्याग करावा लागू शकतो, अशीही शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

तिसऱ्या जागेसाठी या दोघांशिवाय विदर्भातून चारवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या. मात्र, यावेळी पराभूत झालेल्या माजी खासदार आहिर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. विदर्भातील बहुजन चेहरा व पक्षातील महत्वाचे स्थान या दृष्टीने अहिर यांचा विचार होऊ शकतो. अहिर यांच्याबरोबरच मराठवाड्यातून विजया रहाटकर यांचे नावदेखील चर्चेत आघाडीवर आहे. औरंगाबादचे महापौपरपद भूषविलेल्या रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. या पार्श्‍वभूमीवर महिला आणि मराठवाड्याला संधी म्हणून रहाटकर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. गेल्यावेळी खासदार साबळे यांना अचानकपणे बोलवून खासदारकीची संधी देण्यात आली होती. खासदार संजय काकडेदेखील खासदार झाले होते. या पार्श्‍वभूमीवर रहाटकर व अहिर यांच्याबरोबरच खासदार साबळे व काकडे यांचीही नावे चर्चेत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख