नागपूरचा पहिला निकाल चंद्रशेखर बावनकुळेंना धक्का देणारा!

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली....
chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankule

नागपूर : जिल्हा परिषदेचा पहिला निकाल माजी मंत्री व भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का देणारा ठरला.

त्यांचे गाव असलेल्या कोराडी सर्कलमधून कॉंग्रेसचे ज्ञानेश्‍वर (नाना) कंभाले विजयी झाले. बावनकुळे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय मैंद यांचा त्यांनी पराभव केला. कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांनाही त्यांच्या धानला गावातच पराभवचा सामना करावा लागला. धामना सर्कलमधून माजी उपाध्यक्ष कॉंग्रेसचे तापेश्‍वर वैद्य यांनी सावरकर यांचे निकटवर्ती चांगो तिजारे यांचा पराभव केला.

हिंगणा तालुक्‍यात आमदार समीर मेघे यांनी त्यांची इज्जत राखली. भाजपला कुही तालुक्‍यात भाजपने अपेक्षेच्यावर कामगिरी केली आहे. येथे तीन जागांवर भाजपने विजय मिळविला. येथील बंडखोरी शमविण्यासाठी बावनकुळे यांनी पुढाकार घेतला होता. भाजपचे सावनेर, कळमेश्‍वर, नरखेड, हिंगणा, नागपूर ग्रामीण तालुक्‍यात नुकसान झाले.

जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा कॉंग्रेसची दमदार एन्ट्री झाली आहे. महाविकास आघाडीने 58 पैकी 36 जागांवर विजय मिळविला आहे. कॉंग्रेने स्वबळावर 42 पैकी 28 जागांवर विजय मिळविला. जिल्ह्यातील कॉंग्रेसचे दबंग नेते मंत्री सुनील केदार यांच्या मतदारसंघातील सर्व 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती जागांवर विजय मिळवित भाजपची दानादाण उडविली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून मंत्री केदार यांनी जबाबदारी घेतली होती. या निवडणुकीसाठी त्यांनी संपूर्ण जिल्हा पालथा घातला होता. त्याचे अपेक्षित यश मिळाले आहे. सावनेरसह ते कळमेश्‍वर, रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा व नागपूर ग्रामीणमध्ये सातत्याने दौऱ्यावर होते. या भागात त्यांनी जोरदार प्रचार केल्याने कॉंग्रेसचे बाहुबल वाढले आहे. रामटेक, पारशिवनी, मौदा तालुक्‍यात तीन तर कामठी तालुक्‍यात दोन जिल्हा परिषद सर्कलमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले. सावनेरच्या केळवद मधून माजी विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी भाजपचे गिरीश मोवाडे यांचा पराभव केला. वलनी सर्कलमधून प्रकाश खापरे विजयी झाले, त्यांनी भाजपचे अरुण सिंग व राष्ट्रवादीचे किशोर चौधरी यांचा पराभव केला.

उमरेड मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार राजू पारवे व जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी प्रचार केला होता. कॉंग्रेसला उमरेडमध्ये तीन, भिवापूरमध्ये दोन जागा मिळविता आल्या. महाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला कुही तालुक्‍यातील मांढळ मधून विजय मिळविला. कुही तालुक्‍यात कॉंग्रेसला फटका बसला आहे. येथील तिन्ही जागा कॉंग्रेसने गमाविल्या. नरखेड तालुक्‍यातील जलालखेडा येथून कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाल्याने माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांचेही वजन कायम राहीले.

काटोल तालुक्‍यातील राष्ट्रवादीने एक जागा शेकापसाठी सोडली होती. येथून शेकपाचे समीर उमप निवडून आले. मात्र कोंढाळीची जागा राष्ट्रवादीकडून भाजपने हिसकावली आहे. मेटपांजरा सर्कलमधून आमदारपुत्र सलील देशमुख विजयी झाले, त्यांनी भाजपचे प्रवीण अडकिणे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी व शेकाप अशा तीन जागा काटोलमध्ये महाआघाडीच्या खात्यात आल्या. नरखेड तालुक्‍यात तीन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आल्याने चारही जागा महाआघाडीकडे आहेत. हिंगणा तालुक्‍यात राष्ट्रवादीची धुरा रमेश बंग यांच्या हाती होती, त्याचे पुत्र दिनेश बंग यांनी कॉंग्रेसचे उमेदवार व जिल्हा परिषदेतील आक्रमक नेते बाबा आष्टणकर यांचा पराभव केला. मात्र, तालुक्‍यात राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नसून सातपैकी तीन जागांवरच समाधान मानावे लागले.

शिवसेनेला मोठा फटका बसला असून केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. रामटेक तालुक्‍यातील नगरधन येथून संजय झाडे निवडून आले आहे. बेला सर्कलमधून अपक्ष वंदना बालपांडे विजयी झाल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसला 11 जागा तर राष्ट्रवादीला तीन जागांचा फायदा झाला आहे. भाजपला सहा जागांचे नुक सान झाले. तर शिवसेनेला 7 जागा गमवाव्या लागल्या. बसपाने यावेळी जिल्हा परिषद निवडणूक लढविली नाही. गत निवडणुकीत बसपाच्या तीन जागा होत्या. आॅफ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com