भाजपचा कामकाजावर बहिष्कार; महाविकास आघाडीचा विश्वासदर्शक ठरावाचा मार्ग मोकळा

विधानसभेचे आजचे कामकाज बेकायदा असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने आज कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला.
Bjp Boycotts Assembly Proceedings
Bjp Boycotts Assembly Proceedings

मुंबई : विधानसभेचे आजचे कामकाज बेकायदा असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने आज कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीचा विश्वासदर्शक ठराव जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला.

विधानसभेचे कामकाज सुरु होताच दिलीप वळसे पाटील यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची ओळख करुन दिली. या कामकाजावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रातील उघड मतदान पद्धती व थेट प्रक्षेपण याबाबचा निर्णय वाचून दाखवला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच विश्वासदर्शक ठराव घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

काँग्रेसचे अशोक चव्हाण, "महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रीमंडळावर ही विधानसभा विश्वास व्यक्त करत आहे,'' असा ठराव मांडला नवाब मलिक, सुनील प्रभू व जयंत पाटील यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. आधी आवाजी मतदान घेतले व नंतर प्रत्यक्ष संख्या मोजणीस सुरुवात झाली.

त्यावेळी भाजपने बहिष्कार घालण्याचे घोषीत करत सभागृह सोडले. याबाबत फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ''विधानसभा बोलावण्यासाठी राज्यपालांनी समन्स बजावलेले नाही, तसेच मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध आहे. राज्यपालांनी मी म्हटल्यावर जशीच्या तशी शपथ वाचावी लागते. काहींनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतले, कुणी सोनिया गांधींचे, कुणी शरद पवारांचे नाव घेतले. प्रोटेम स्पीकर हटवण्याचे काम नियमबाह्य पद्धतीने करण्यात आले. घटनेची पायमल्ली केली आहे. अशा पद्धतीने हंगामी स्पीकर हटवण्यात येत नाही. कौल -शकधरचा दाखला आम्ही दिला आहे. विधानसभेच्या इतिहासात जो वर नियमित अध्यक्ष नेमले जात नाहीत तो पर्यंत विश्वासदर्शक ठराव घेता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तेव्हा पुरता होता. अध्यक्ष पदाची निवडणूक हरण्याच्या भितीने टाळली. त्यांच्या आमदारांवर त्यांचा विश्वास नाही. या करता उघड मतदानाचा घाट घालण्यात आला आहे.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com