उल्हासनगर पालिकेतून सत्ताउतार होताच भाजपाच्या नगरसेवकांनी महासभा गाजवली

शिवसेना-ओमी कालानी-राष्ट्रवादी-कॉंग्रेस-रिपाइं आठवले-पीआरपी यांनी हातमिळवणी केल्यावर अवघ्या अडीच वर्षातच भाजपा-साईपक्ष यांच्यावर सत्ताउतार होण्याची नामुष्की ओढावली आहे.त्यानंतर काल सोमवारी उशिरापर्यंत चाललेली पहिलीच महासभा भाजपाच्या नगरसेवकांनी गाजवली.
Bjp Became Aggressive in Ulahsnagar Corporation GB
Bjp Became Aggressive in Ulahsnagar Corporation GB

उल्हासनगर : शिवसेना-ओमी कालानी-राष्ट्रवादी-कॉंग्रेस-रिपाइं आठवले-पीआरपी यांनी हातमिळवणी केल्यावर अवघ्या अडीच वर्षातच भाजपा-साईपक्ष यांच्यावर सत्ताउतार होण्याची नामुष्की ओढावली आहे.त्यानंतर काल सोमवारी उशिरापर्यंत चाललेली पहिलीच महासभा भाजपाच्या नगरसेवकांनी गाजवली.

सभेच्या सुरुवातीलाच भाजपाचे नगरसेवक मनोज लासी, जमनादास पुरस्वानी, किशोर वनवारी, प्रदीप रामचंदानी आदींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा फोटो ऊंचावून घोषणाबाजी करून नंतर फोटोला लाथाडून आक्रमक पवित्रा घेतला.

त्यानंतर चार प्रभाग क्षेत्रातील खड्डे भरण्यासाठी दोन कोटी रुपयांची मान्यता दिली असताना हे काम साडे सात कोटी पर्यंत वाढविले असल्याने ह्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी महापौर,साईपक्षाचे गटनेते जीवन इदनानी यांनी केल्यावर भाजपा गटनेते जमनादास पुरस्वानी,राजू जग्यासी, नगरसेवक मनोज लासी,डॉ. प्रकाश नाथानी, प्रदीप रामचंदानी यांनी घोटाळ्याचे प्रकरण उचलून धरले.

याबाबत माहिती देताना शहर अभियंता महेश सीतलानी यांनी 16 रस्त्यांचे काम 65 टक्के पूर्ण झाले आहे. या कामाला स्थायी समितीने मान्यता दिली होती. मात्र त्या रक्कमेत काम पूर्ण होत नसल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम 73 क आणि ड, 5.2.2 अंतर्गत पालिका आयुक्तांनी वाढीव कामाला मान्यता दिली आहे. तसेच जनहित याचिके अंतर्गत न्यायालयाने शहर खड्डे मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अंतर्गत हे काम जोमाने चालू असल्याचे सितलानी यांनी सांगितले.

स्थायी समितीने दिलेले अधिकार, प्रकरण 5 अंतर्गत शासनाने दिलेले अधिकार तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर होती, यामुळे उल्हासनगरवासीयांना खड्ड्यांमधून सूट देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महासभेत स्पष्ट केले.
दरम्यान सभागृहनेते शेरी लुंड, गटनेते जमनादास पुरस्वानी,मनोज लासी, प्रदीप रामचंदानी आदिनी वसणशाह दरबार, थायरासिंग दरबार, स्वामी शांती प्रकाश आश्रम या तीन ठिकाणांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com