जळगाव,रावेरमध्ये अंतर्गत धुसफुशीमुळे भाजप उमेदवारीत बॅकफुटवर!

सत्तेतील पक्षात वाढती स्पर्धा असते, त्यामुळे आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पत्ते कट करण्यासाठी खेळी केली जाते.जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात लोकसभेच्या उमेवारीसाठी अशीच जोरदार स्पर्धा असल्याने एकेकाळी उमेदवारीत 'फ्रंटफुट'वर असलेला पक्ष आज जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात 'बॅकफुट'वर गेला असून दोन खासदार असूनही उमेदवारीबाबत पक्षनेतृत्वानेच संभ्रम निर्माण केला आहे.
Raksha Khadse - Haribhau Jawle
Raksha Khadse - Haribhau Jawle

जळगाव : सत्तेतील पक्षात वाढती स्पर्धा असते, त्यामुळे आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पत्ते कट करण्यासाठी खेळी केली जाते.जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात लोकसभेच्या उमेवारीसाठी अशीच जोरदार स्पर्धा असल्याने एकेकाळी उमेदवारीत 'फ्रंटफुट'वर असलेला पक्ष आज जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात 'बॅकफुट'वर गेला असून दोन खासदार असूनही उमेदवारीबाबत पक्षनेतृत्वानेच संभ्रम निर्माण केला आहे.

या उलट राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार जाहीर करून जळगाव मतदार संघात एक पाऊल पुढे टाकले आहे. तर रावेर मतदार संघाच्या उमेदवारबाबत पक्ष 'चाणाक्ष खेळी'करून भाजपला हुलकावणी देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघ आहेत. दोन्ही लोकसभा मतदार संघात भाजपचेच प्राबल्य आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात भाजप ए.टी.पाटील खासदार आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या रक्षा खडसे खासदार आहेत. या दोन्ही मतदार संघातील उमेदवाराचे काम चांगले असल्याचा अहवाल पक्षातर्गंत सर्वेक्षणात दिसून आला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. मात्र, आता राजकीय वारे वेगाने वाहत असून दिवसागणिक चित्र बदलत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जळगाव लोकसभेचे भाजपचे खासदार ए.टी.पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार हे निश्‍चित होते. तशी चर्चाही सुरू होती. उलट त्यांच्या समोर विरोधी पक्षाचा उमेदवार कोण?असे चित्र होते.मात्र दुसरीकडे पक्षातही उमेदवारीची स्पर्धा होतीच, त्यात अचानकपणे एक व्हिडीओ क्‍लीप व्हायरल झाली अन एका दिवसात सगळेच चित्र पालटले. त्यामुळे खासदार पाटील यांच्या उमेदवारीच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. त्यांचे नाव उमेदवारीत मागे पडले अन पक्षातर्फे इतर नावे पुढे येवू लागली. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी गुलाबराव देवकर यांचे नाव जाहिर केले.त्यामुळे आज जळगाव लोकसभेची राजकीय परिस्थिती संपूर्ण बदलली आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देवकर यांच्या समोर भाजपचा उमेदवार कोण?असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

रावेरातही भाजपचा घोळ
रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या रक्षा खडसे खासदार आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या त्या स्नुषा आहेत. लोकसभेतील त्यांची कामगिरीही चांगली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबतही कोणताही प्रश्‍न नाही, मात्र, पक्षातूनच या मतदार संघातील उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.मंत्रीमंडळातून बाहेर पडल्यानंतर खडसे यांची नाराजी आहे. त्यांच्यावर असलेल्या आरोपात त्यांना क्‍लिन चिट मिळाल्याचा त्यांचा दावा आहे. पक्षाने त्या बाबत अधिकृतपणे जाहिर करावे अशीही त्यांची मागणी आहे. तर त्यांचा मंत्रीमंडळात पुन्हा सामावेश करावा अशी पक्षातील त्यांच्या समर्थकांचीच मागणी आहे.

दुसरीकडे जलसपंदामंत्री गिरीश महाजन व खडसे यांच्यातील अंतर्गत वाद शमलेला नाही.तर गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदार संघाची पक्षातर्फे जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पक्षात सुरू असलेल्या या अंतर्गत राजकीय धुसफूसीत रक्षा खडसेंची उमेदवारी कट होण्याची चर्चा आहे. त्यातच माजी खासदार व विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांना उमेदवारीबाबतही चर्चा सुरू झाली आह, तर दुसरीकडे पक्षातर्फे एकनाथ खडसे यांनाच उमेदवारीबाबत गळ घातली जाण्याचीही शक्‍यता पक्षातर्गत वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे रावेर मतदार संघातही भाजपच्या उमेदवारीबाबत पक्षातर्गत संभ्रम निर्माण करण्यात आला, असून या मतदार संघातही भाजप आता 'बॅकफुट'वर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com