भाजपने डॉ. सुजित मिणचेकरांच्या पाठीत खंजीर खुपसला : बाबासाहेब शिंगे 

..
mla-sujeet-minchekar
mla-sujeet-minchekar

शिरोली पुलाची  : ज्यांच्याबरोबर युती आहे. त्या पक्षाने पाठीत खंजीर खुपसला आहे. मित्र पक्षाची ही कृती आम्ही जवळून पहिली आहे. डॉ. मिणचेकर यांचे सर्व पक्षांशी असलेले संबध पाहता, त्यांना झालेला विरोध दुर्देवी आहे, असे मत बाबासाहेब शिंगे यांनी व्यक्त केले.  हातकणंगले विधानसभा मतदार संघातील पराभवाच्या चिंतन मेळाव्यात ते बोलत होते.


पराभवाचे खापर कोणावरही फोडू नका, कारण ती जबाबदारी मी स्वतःवर घेत आहे; मात्र आता थांबायचे नाही, पुन्हा जोमाने काम सुरू करायचे. हातकणंगलेतील संपर्क कार्यालय जनसेवेसाठी कायम सुरू राहणार असून, प्रत्येक वर्षीचे कार्यक्रम त्याच जोमाने होतील, असा विश्वास माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केला. 


माजी आमदार डॉ. मिणचेकर म्हणाले, "कार्यकर्त्यांची खंत अंतर्मुख करणारी आहे. मला अपयश येऊनही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत याचा अभिमान आहे. दहा वर्षे अहोरात्र गट, तट, पक्ष भेद न करता विकासाची दिशा देणारे काम केले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला. राज्यात आपली सत्ता येणार आहे. त्यामुळे मतदार संघात आमदारांपेक्षा जादा विकास निधी खेचून आणू. पराभवाची सल बाजूला ठेवून, जनतेशी एकरूप व्हा. प्रत्येक गावात सेनेच्या शाखा विस्तार करा. पुन्हा लढायचे आणि जिंकायचे आहे.'


 जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, विनायक विभुते, महेश चव्हाण, अविनाश बनगे, हेरलेचे उपसरपंच विजय भोसले, सुरेश यादव, अनिल खवरे यांनी मनोगत व्यक्त केले. दिनकर ससे, अमोल देशपांडे, सुनील माने, अंकुश माने, जय करडे, सुनील सुतार, अभिनंदन सोळांकूरे, भागवत शिंदे, सुवर्णा धनवडे, मालती खोपडे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com