'या' कारणासाठी सिद्धार्थ शिरोळे, कांबळे, भिमाले देणार पालिकेतील पदांचा राजीनामा
महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सभागृहनेतेपदाची जबाबदारी भिमाले यांच्याकडे सोपविली होती. ते पावणेतीन वर्ष या पदावर आहेत. तर, कांबळे हे विधानसभा निवडणुकीत कँटोन्मेंट मतदारसंघातून निवडून आले आहेत, तर शिरोळेही शिवाजीनगर मतदारसंघातून आमदार झाले आहेत.
पुणे : राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेतील पदाधिकारी बदलणयाचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला असून, महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्क्ष, सुनिल कांबळे आणि 'पीएमपीएमएल' चे संचालक सिध्दाथॆ शिरोळे यांना पदांचा राजीनामा देण्याचा आदेश पक्षाने दिला आहे.
महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सभागृहनेतेपदाची जबाबदारी भिमाले यांच्याकडे सोपविली होती. ते पावणेतीन वर्ष या पदावर आहेत. तर, कांबळे हे विधानसभा निवडणुकीत कँटोन्मेंट मतदारसंघातून निवडून आले आहेत, तर शिरोळेही शिवाजीनगर मतदारसंघातून आमदार झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीत पडझड झाल्याने पदाधिकारी बदलणयाचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ म्हणाल्या, 'सभागृहनेते, स्थायीचे अध्यक्ष आणि पीएमपीच संचालकांना राजीनामे देण्यास सांगितले आहे.नवे पदाधिकारी लवकरच निवडले जातील.'