bjp on apposition seat amit shah decission | Sarkarnama

भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई : राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे सहकार्य मिळत नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करून शकत नाही त्यामुळे ज्यांना सत्ता स्थापन करायची त्यांना शुभेच्छा असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव दिल्लीचा निरोप घेऊन वर्षावर दाखल झाले. तेथे सुरू असलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला अमित शहा यांनी दिल्लीतून व्हीसीद्वारे मार्गदर्शत केले. भाजपे विरोधीबाकावर बसण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेईल असे बोलले जात होते तसेच झाले नाही. वर्षावरील बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट पुन्हा राजभवनावर गेले आणि तेथे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील असे सांगितले जात होत मात्र तसे झाले नाही भाजपने सत्तेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख