भाजपचे शिवसेनेवर रत्नागिरीत दबावतंत्र, आधी राणेंविरुद्धचा उमेदवार मागे घ्या 

राणेंच्या विरोधातील शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही तर कोकणातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 4 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 मतदारसंघात शिवसेनेला फटका बसू शकतो.
mla_nitesh_rane
mla_nitesh_rane

गुहागर  :  कणकवलीत नितेश राणेंविरोधात शिवसेनेचे सतीश सावंत यांनी उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेनेने त्यांना एबी फॉर्मही दिला आहे. ही उमेदवारी शिवसेनेने मागे घेतली नाही तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात भाजप बंडखोरांना पाठिंबा देईल, असे भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू स्पष्ट केले आहे.

नितेश राणेंना भाजपने अधिकृतरित्या कणकवलीत उमेदवारी दिल्यावर शिवसेनेने कणकवलीत अधिकृत उमेदवार दिला. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपने सावंतवाडीत राजन तेली, कुडाळमध्ये दत्ता सामंत यांचे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. रत्नागिरीतील दापोलीमध्ये केदार साठे व चिपळुणात तुषार खेतल यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गुहागरमधून रामदास राणेंनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामागची भूमिका स्पष्ट करताना डॉ. विनय नातू यांनी राजकारणात गाफील राहून चालत नाही असे सांगितले होते.

कणकवलीतील शिवसेनेच्या भूमिकेवर नातू म्हणाले , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ एक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. याठिकाणी उमेदवार कोण हे ठरविण्याचा अधिकार भाजपला आहे तरीदेखील शिवसेनेने अधिकृत उमेदवार दिला. त्याचे परिणाम संपूर्ण कोकणात होतील. भाजप बंडखोरांना पाठिंबा देईल.सिंधुदुर्ग, रत्नागिरीत भाजपने हे दबावतंत्र  अवलंबले आहे.

राणेंच्या विरोधातील शिवसेनेच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही तर कोकणातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 4 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 मतदारसंघात शिवसेनेला फटका बसू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com