BJP Announces Candidature of Three MLA in Nashik | Sarkarnama

भाजपची नाशिकच्या तिन्ही आमदारांना उमेदवारी; सानप यांना गॅसवर ठेवले

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

भारतीय जनता पक्षातर्फे आज जाहीर उमेदवार यादीत तिन्ही विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली. प्रमुख दावेदार बाळासाहेब सानप यांना मात्र वेटींगवर ठेवले. मध्य मतदारसंघात आमदार फरांदे यांना पक्षांतर्गत विरोध असूनही उमेदवारी मिळाली. त्यामुळे मध्य मतदारसंघातील प्रमुख नेते व माजी आमदार वसंत गिते बंडखोरी करणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

नाशिक : भारतीय जनता पक्षातर्फे आज जाहीर उमेदवार यादीत तिन्ही विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली. प्रमुख दावेदार बाळासाहेब सानप यांना मात्र वेटींगवर ठेवले. मध्य मतदारसंघात आमदार फरांदे यांना पक्षांतर्गत विरोध असूनही उमेदवारी मिळाली. त्यामुळे मध्य मतदारसंघातील प्रमुख नेते व माजी आमदार वसंत गिते बंडखोरी करणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

आज जाहीर झालेल्या भाजपच्या उमेदवार यादीत जिल्ह्यातील डाॅ राहुल आहेर (चांदवड), सीमा हिरे (नाशिक पश्चिम) आणि देवयानी फरांदे (नाशिक मध्य) यांना उमेदवारी जाहीर केली. नाशिक पूर्व मतदारसंघातील विद्यमान आमदार बाळासाहेब सानप हे प्रमुख दावेदार होते. मात्र, पक्षातील नेते, नगरसेवक व इच्छुकांच्या विरोधामुळे पहिल्या यादीत त्याचे आले नाही. याविषयी आता अनिश्चितता आहे.

Image result for Dr. Rahul AherImage result for Seema Hiray

       राहुल आहेर                     सीमा हिरे

त्यामुळे येथे महापालिका स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, हेमंत गायकवाडच आणि दिनकर आढाव यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय मनसेचे संभाव्य उमेदवार राहूल ढिकले यांच्या नावावर चर्चा होत आहे. त्यामुळे ज्यांना प्रमुख दावेदार मानले जात होते, त्या माजी महापौर व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचेच भवितव्य धुसर झाले आहे.

Image result for Vasant Gite

           वसंत गिते

भाजपने नाशिक मध्य मतदारसंघात आमदार फरांदे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात पंधरा इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. या इच्छुकांनी वसंत गिते अथवा विजय साने यांच्या पैकी एकाला उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर विचार झाला नाही. त्यामुळे नाराजी आहे. या नाराजीतून बंडखोरीची शक्यता वाढली. कदाचित श्री गिते काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही बंडखोरी भाजप उमेदवाराला अडचणींची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याविषयी उत्सुकता वाढली आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख