महापौरपदासाठी पुण्यात भाजपा-सेना आमनेसामने

भाजपकडून मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे आणि हेमंत रासने यांचे नाव आघाडीवर
महापौरपदासाठी पुण्यात भाजपा-सेना आमनेसामने

पुणे : महापौरपदाची निवडणूक पुण्यात येत्या 26 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी व शिवसेना हे युतीत इतकी वर्षे मित्र असलेले पक्ष महापौर निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकाविरोधात लढणार आहेत.

पुण्यात भाजपाचे तब्बल 99 तर शिवसेनेचे केवळ 10 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपाच्या सत्त्तेत काहीच फरक पडणार नसला तरी हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.

महापौरपदाची सोडत पुण्यासाठी सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाल्याने भाजपातील इच्छुकांमध्ये कमालीची स्पर्धा निर्माण झाली आहे. पक्षाच्यावतीने अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र, येत्या चार-पाच दिवसात पक्षाकडून महापौरपदासाठी नाव अंतिम केले जाणार आहे.

कॉंग्रेसचे 10 तर राष्ट्रवादीचे 42 नगरसेवक पुणे महापालिकेत आहेत. यात शिवसेनेच्या 10 जणांची भर पडली तर तीन पक्षांचे मिळून 62 नगरसेवक होतील. मात्र, भाजपाचे संख्याबळ तब्बल 99 असल्याने पुण्यात भाजपाला सत्तेची चिंता नाही.

अडीच वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपा-सेना स्वतंत्रपणे लढले.या निवडणुकीत शिवसेनेची फारच वाताहत झाली. गेल्या काही निवडणुकांमध्ये शिवसेनेची पुण्यातील ताकद सातत्याने घटलेली आहे. याउलट भाजपाची ताकद सलगपपणे वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तर यापुढील काळात स्थानिक राजकारणात या तीन पक्षांची मोठी ताकद निर्माण होणार असून यांच्यापुढे भाजपाचा टिकाव लागणे अवघड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com