एकीकडे युतीची भाषा आणि दुसरीकडे औरंगाबादमध्ये भाजपकडून मुलाखती

 एकीकडे युतीची भाषा आणि दुसरीकडे औरंगाबादमध्ये भाजपकडून मुलाखती

औरंगाबाद : शिवसेना-भाजप युती करून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात भरघोस यश मिळाले. त्यानंतर आता पुन्हा विधानसभेसाठी युती होणार असल्याचे दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते सांगत आहेत. असे असताना भाजपकडून औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. 

आगामी विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून लढणार आमचं ठरलंय अस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सांगत आहेत. मात्र दुसरीकडे दोन्ही पक्षातर्फे स्वतंत्र तयारीही सुरू करण्यात आली आहे. 

भाजपतर्फे 288 मतदारसंघात निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची जनाशीर्वाद यात्राही राज्यभर सुरू आहे . त्या माध्यमातून जनाधार मिळवण्याचा प्रयत्नही स्वतंत्रपणे शिवसेना करीत आहे. 

अशावेळी भाजपतर्फे औरंगाबाद शहरातील पूर्व पश्‍चिम आणि मध्यसह जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत .केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या माध्यमातून या मुलाखती होत आहेत. मुलाखतीसाठी प्रत्येक मतदारसंघातून आठ ते दहा इच्छुक मुलाखतीला होते. सकाळी अकरापासून वाळूजच्या हायटेक कॉलेजवर मुलाखती सुरु आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com