सेना-भाजप संघर्ष रस्त्यावर, नागपुरात शेलार व राणांचे पुतळे जाळले 

आमदार राणा नागपुरात येत असताना नागपूरजवळील वाडी येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र आमदार राणा यांच्या गाडीवर दगडफेक केल्याच्या घटनेचा इन्कार केला आहे. शिवसैनिक मागून वार करणारे मावळे नाहीत. शिवसैनिकांनी ठरविल्यास राणांना महाराष्ट्रातून सळो की पळो करून सोडू, असा इशारा नागपूर जिल्हा शिवसेना प्रमुख सतीश हरडे यांनी दिला.
सेना-भाजप संघर्ष रस्त्यावर, नागपुरात शेलार व राणांचे पुतळे जाळले 

नागपूर : शिवसेना व भाजपमधील संघर्ष आता नागपुरातील रस्त्यांवर आला आहे. नागपुरात आज शिवसैनिकांनी आमदार आशीष शेलार व अपक्ष आमदार रवि राणा यांचे पुतळे जाळले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार व अमरावतीचे अपक्ष आमदार रवि राणा यांनी शिवसैनिकांच्या विरोधात वक्तव्य केले होते. येत्या काही दिवसात शिवसेना फुटणार असून 22 आमदार शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत असल्याचे आमदार यांनी म्हटले होते. 

आमदार राणा नागपुरात येत असताना नागपूरजवळील वाडी येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र आमदार राणा यांच्या गाडीवर दगडफेक केल्याच्या घटनेचा इन्कार केला आहे. शिवसैनिक मागून वार करणारे मावळे नाहीत. शिवसैनिकांनी ठरविल्यास राणांना महाराष्ट्रातून सळो की पळो करून सोडू, असा इशारा नागपूर जिल्हा शिवसेना प्रमुख सतीश हरडे यांनी दिला. 

आमदार आशीष शेलार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर टीका करीत आहेत. आज सकाळी मानेवाडा चौकात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश हरडे, भंडारा जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख दीपक शेंदरे, चिंटू पांडे, नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी मानेवाडा चौकात "आशीष शेलार हाय हाय', "रवि राणा मुर्दाबाद', "शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है', अशा घोषणा देत शेलार व राणा यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हा प्रमुख सतीश हरडे म्हणाले, की, आशीष शेलार यांना सत्तेचा माज आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उपकार आशीष शेलार यांनी विसरू नये, असेही हरडे यावेळी म्हणाले. या आंदोलनामुळे मानेवाडा चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

शिवसेना भेकडांची फौज- राणा 
शिवसेना ही भेकडांची फौज असल्याचा हल्ला आमदार रवी राणा यांनी चढविला आहे. रवी राणा यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. याबद्दल बोलताना आमदार राणा म्हणाले, शिवसेनेमध्ये भेकडांची फौज आहे. त्यामुळे त्यांनी रात्रीच्या अंधारात माझ्या गाडीवर दगडफेक केली. या संदर्भात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com