`धाकट्या भावा`विषयी मोदींचा चकार शब्द नाही : भाजप-सेना युतीची शक्यता धूसर

शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीविषयी रोज उत्कंठावर्धक घडामोडी घडत आहेत. अनंत चतुर्दशीच्या आधी जागावाटप जाहीर होणार होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज झालेल्या नाशिक येथील मेळाव्यात युतीची घोषणा अपेक्षित होती. तेथेही काहीच न घडल्याने युतीच्या संभाव्येविषयी नकाराचा सूर राजकीय वर्तुळात येत आहे.
`धाकट्या भावा`विषयी मोदींचा चकार शब्द नाही : भाजप-सेना युतीची शक्यता धूसर

मुंबई ः महाजनादेश यात्रेची नाशिक येथे सांगता करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजप-शिवसेना युती, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. यामुळे भाजप-शिवसेना युतीची शक्‍यता धुसर होत असल्याचे मानले जात आहे. याचबरोबर शिवसेनेकडे दुर्लक्ष करून जागा वाटपात कमी महत्व देणे ही रणनीती देखील भाजपचे असल्याचे बोलले जाते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गेले दिड महिना महाजनादेश यात्रा काढून राज्यभर प्रचाराचा धुरळा उडवला होता. या महाजनोदश यात्रेचा समारोप पंतप्रधान मोदी यांनी केला. मोदी त्यांच्या भाषणात भाजप-शिवसेनेबाबत काहीतरी बोलतील. युती होण्याच्या दिशेने काही संकेत देतील अशी अटकळ बांधली जात असताना मोदी यांनी याबाबत अवाक्षरही काढले नाही.

मुंबई येथील एका कार्यक्रमात मोदींनी उद्धव ठाकरे यांना आपला छोटा भाऊ म्हटले होते. त्याविषयी मोदींनी आज अवाक्षरही काढले नाही. उलट मोदी यांनी राम मंदिराचा मुददा न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यावर उलटसुलट टिप्पणी का करता, असा सवाल केला.

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभे राहावे. यासाठी उत्तर प्रदेशची वारी केली होती. मोदी यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव यांच्यावर टीका केल्याचे बोलले जाते. त्यामुळे युती होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई येथील आरे प्रकल्पातील कारशेडला शिवसेनेचा असणारा विरोध आणि अलिकडेच कोकणात महाजनादेश यात्रेत नाणार बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले वक्‍तव्य या संकेताला पुष्टी देत असल्याचे मानले जाते.

मित्रपक्षाला दिल्या जाणा-या जागा गृहीत धरून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे भाजपचे गणीत आहे. तर 288 पैकी 144 जागावर हक्‍क सांगत शिवसेना आपला दावा रेटत आहे. मात्र हा दावा भाजपला मान्य नाही. परिणामी भाजप मोठया भावाच्या भुमिकेत जाउन शिवसेनेला 100 ते 110 च्या आसपास जागा देण्याच्या बेतात आहे. यामुळे जागा वाटपावरून युतीचे फाटले जाण्याची शक्‍यता निर्माण झाली असताना पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणात युतीबाबत एक चकार शब्दही काढला गेला नाही. त्यामुळे यास पुष्ठी मिळत आहे.

शिवसेनेला युती हवीच

शिवसेनेला काहीही करून भाजपबरोबर युती हवी असल्याचे राजकिय चित्र आहे. स्वबळावर लढण्याची खुमखुमी असली तरीही भाजप स्वबळावर लढून 140 च्या आसपास जागा जिंकल्या तर भाजपचे सरकार होईल. सत्तेतील सहभाग नोंदविणे शिवसेनेसाठी अवघड जाणार आहे. त्यामुळे भाजपबरोबर तडजोड करण्याशिवाय शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com