भाजपचे आमदार फोडण्यासाठी "ऑपरेशन सत्यविजय '

 भाजपचे आमदार फोडण्यासाठी "ऑपरेशन सत्यविजय '

पुणे : राज्यातील सत्तासंघर्ष आरपारच्या टप्प्प्यावर पोहचला असून, एकमेकांचे आमदार फोडण्यासाठी भाजपासह महाविकास आघाडीने विविध गनिमीकावे सुरु केले आहेत. भाजपाकडून ऑपरेशन "लोटस' तर महाविकास आघाडीकडुन ऑपरेशन "सत्यविजय' सुरु झाले आहे. सत्यविजय ऑपरेशनची जबाबदारी राष्ट्रवादीचे साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 

मोदी लाटेमुळे आपण निवडून येवू की नाही या भितीने कॉंग्रेस राष्ट्रवादीमधून अनेक दिग्गज भाजपमध्ये जाऊन विजयी झाले. मात्र सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आणि अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्यात अस्थिरतेचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक पक्षासाठी ही अटीतटीची लढाई झाली असून, एकमेंकांचे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. याची जबाबदारी भाजपाकडून पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस, राष्ट्रवादी मध्ये राहिलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, बबनराव पाचपुते यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ऑपरेशन लोटस सुरु झाले असतानाच. महाविकास आघाडीकडून ऑपरेशन सत्यविजयाची आखणी करण्यात आली आहे. याची जबाबदारी शशिकांत शिंदे. एकनाथ शिंदे, मिलींद नार्वेकर यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी "सरकारनामा'ला दिली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com