भाजप नेत्यांचा आणि `एक्झिट पोल`चा अंदाज तंतोतंत जुळला! : भाजप-सेना 200 पार

भाजप नेत्यांचा आणि `एक्झिट पोल`चा अंदाज तंतोतंत जुळला! : भाजप-सेना 200 पार

पुणे : भाजप शिवसेनेला म्हणजे महायुतीला दोनशेहून अधिक जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज असून महायुती पुन्हा बहुमताने सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. एक अपवाद वगळता सर्व एक्झिट पोल भाजप-सेनेला दोनशेपेक्षा अधिकच जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करत आहेत.

त्यामुळे महायुतीचे नेते दिवाळी धुमधडाक्‍यात साजरी करतील असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. महाआघाडीला केवळ 60 ते  70 जागांवर समाधान मानावे लागेला असे दिसते. भाजपचे नेते सुरवातीपासून अब की बार 220 पार, असे सांगत होते. त्यांच्या म्हणण्यानुसारच एक्झिट पोलचे अंदाज आलेले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लाट असल्याचे सांगत होते. समोर पहिलवान नसल्याचा त्यांचा अंदाज खरा ठरतो की काय, असे या आकड्यांवरून दिसते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनीही 230 पर्यंत युतीचा आकडा नेऊन ठेवला होता. भाजप स्वबळावरही सत्तेवर येऊ शकते, असे हे आकडे सांगत आहेत. 

विविध वाहिन्यांचे एक्झिट पोलचे आकडे मतदान संपल्यानंतर बरोबर साडेसहाला सुरू झाले. दुपारी तीनपर्यंतच्या माहितीवर आधारीत हा अंदाज असल्याचे या वाहिन्यांनी स्पष्ट केले आहे. सर्वाधिक जागा टाइम्स नाऊच्या पोलमध्ये दिसून येत आहेत. या पोलमध्ये 230 पर्यंत भाजप-सेनाचा आकडा जाऊ शकतो, असा दावा केला आहे. इंडिया टुडेचा आकडा हा 194 पर्यंत आहे.

मुंबई आणि ठाणे पट्ट्यात युती सर्वाधिक जागा जिंकून आघाडीवर राहणार असल्याचे दिसून येत आहे. येथील साठपैकी केवळ तीन ते पाच जागा महाआघाडीला दाखविण्यात आल्या आहेत. 

 राज्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले आहे. यावेळच्या प्रचारात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आदी नेत्यांनी प्रचारात राज्य पिंजून काढले होते. शरद पवार यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला मिळेल, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात या अंदाजात तसे दिसून येत नाही. 


poll in Maharashtra:
Times Now:
BJP+: 230
Cong+: 48
Others: 10

India Today: 
BJP+: 166-194
Cong+: 72-90
Others: 22-34

CNN News 18: 
BJP+: 243
Cong+: 41
Others: 4

Republic:
BJP+: 223
Cong+: 54
Others: 11

ABP News
BJP+: 204
Cong+: 69
 Others: 15

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com