दिल्लीत भाजपचा घोषणांचा महापूर, दिल्ली जाहीरनामा प्रकाशित

वीज व पाणी मोफत देण्याच्या अरविंद केजरीवाल सरकारच्या योजनेला हात लावण्याचे धाडस भाजपमध्ये नसल्याचे तर यावेळी दिसलेच पण आप ला प्रत्युत्तर देताना भाजपनेही- आर्थिक मागास कुटुंबातील मुलींना इलेक्‍ट्रिक स्कूटी मोफत, व 9 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सायकल मोफत, गरीब घरांतील मुलींच्या जन्मानंतर विमा उतरवून 21 व्या वर्षी तिला 2 लाखांची भेट अशा मोफत आश्वासनांचा मारा केला आहे. 69 मुद्याचा हा भाजपचा दिल्ली जाहीरनामा आहे.
दिल्लीत भाजपचा घोषणांचा महापूर, दिल्ली जाहीरनामा प्रकाशित

नवी दिल्ली : गरीबांना 2 रूपये किलोने गव्हाचे पीठ, दिल्लीतील सर्व रिक्त जागा 1 ते दीड वर्षांत भरणार, 10 लाख युवकांना नोकऱ्या देणार, यमुना विकास बोर्डाची स्थापना आदी घोषणांच्या महापुरात भाजपचा दिल्ली जाहीरनामा (भाजपच्या भाषेत संकल्पपत्र) चिंब भिजलेला दिसतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, निवडणूक प्रभारी प्रकाश जावडेकर, दिल्लीचे भाजप प्रमुख शाम जाजू, राष्ट्रीय माध्यम विभागप्रमुख संजय मयूख आदींच्या उपस्थितीत आज या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. देश बदला-दिल्ली बदलो, ही भाजपची यंदाची टॅगलाईन आहे. जाहीरनामा समितीचे प्रमुख डॉ. हर्षवर्धन व दिल्लीचे भाजप खासदार उपस्थित होते. 

वीज व पाणी मोफत देण्याच्या अरविंद केजरीवाल सरकारच्या योजनेला हात लावण्याचे धाडस भाजपमध्ये नसल्याचे तर यावेळी दिसलेच पण आप ला प्रत्युत्तर देताना भाजपनेही- आर्थिक मागास कुटुंबातील मुलींना इलेक्‍ट्रिक स्कूटी मोफत, व 9 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना सायकल मोफत, गरीब घरांतील मुलींच्या जन्मानंतर विमा उतरवून 21 व्या वर्षी तिला 2 लाखांची भेट अशा मोफत आश्वासनांचा मारा केला आहे. 69 मुद्याचा हा भाजपचा दिल्ली जाहीरनामा आहे. 

आपच्या विकासाला शाहीन बाग, गोळ्या घाला... व पाकिस्तानसारख्या भाषेत उत्तर देणाऱया भाजपमध्ये जाहीरनाम्यात मात्र केजरीवालांनी 8 लाख बेरोजगारांना नोकरयांचे आश्वासन दिले तर आम्ही 10 लाख तरूणांना रोजगार देऊ अशी स्पर्धेची मानसिकता दिल्ली भाजपमध्ये दिसून आली. गडकरी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात शाहीन बागेचा शब्ददेखील उच्चारला नाही व सारे भाषण फक्त दिल्लीच्या सर्वंकष विकासाच्या मुद्याभोवती केंद्रीत ठेवून पक्षनेतृत्वाच्या ध्रुवीकरणाच्या कार्डाला परस्पर उत्तर दिल्याचे मानले जाते. दिल्लीकरांना जलप्रदूषण व वायूप्रदूषणापासून फक्त भाजपच मुक्ती देऊ शकतो असे सांगताना गडकरी म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारच्या सशक्त इंजिनाला दिल्लीतील भाजप सरकारच्या इंजिनाची जोड मिळाली तर ती दिल्लीच्या विकासाची बुलेट ट्रेन ठरेल. भाजपचा इतिहासच दिल्लीशी घट्ट जोडलेला आहे व भाजपच दिल्लीचे नशीब बदलवून टाकेल असे सांगून गडकरी म्हणाले की भाजपने हे संकल्पपत्र घरात बसून तयार केलेले नसून तब्बल 11 लाख दिल्लीकरांच्या सूचना गंभीरपणे घेऊन ते तयार केलेले आहे. 
भाजप संकल्पपत्र ठळक मुद्दे 
- नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी सरकार 
- कॉलनी विकास बोर्डाची स्थापना 
- व्यापाऱ्यांना एका वर्षात फ्री होल्डची सुविधा 
- दिल्ली सरकारने रोखून धरलेल्या आयुष्मान भारत, पंतप्रधान आवास व किसान सन्मान निधी योजनांची तत्काळ अंमलबजावणी 
- 10 नवी महाविद्यालये व 200 शाळा उघडणार 
- दहा हजार कोटींची समृध्द दिल्ली पायाभूत सुविधा योजना. 
- गरीब विधवांच्या मुलींच्या लग्नासाठी 51 हजारांच्या भेटवस्तू देणार 
- कचऱयाचे ढिगारे 2 वर्षांत पूर्णपणाने हटविणार 
- युवा, महिला, मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विकास बोर्डांची स्थापना. 
- राणी लक्ष्मीबाई महिला सुरक्षा योजना आणणार. 
- साऱ्या फेरीवाल्यांना नियमित करणार. 
- कलाकार युवकांसाठी टॅलेंट हंट योजना 
- झोपडपट्ट्या व दिल्लीतील सर्व 280 वॉर्डांमध्ये वाचनालयांची स्थापना 
- 14 मतदारसंघांतील निर्वासितांच्या वस्त्यांतील लोकांना मालकी हक्क 
- फीट इंडिया कार्यक्रमांची दिल्लीतही अंमलबजावणी 
- ऑटोरिक्‍शा व टॅक्‍सी स्टॅंड पक्के बनविणार 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com