दिल्लीच्या निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री ! भाजपचा लाडका मुददा अखेर प्रचारात

दिल्लीच्या निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री ! भाजपचा लाडका मुददा अखेर प्रचारात

नवी दिल्ली : दिल्लीची निवडणूक असेल तर त्यात पाकिस्तानचे काय काम, असा प्रश्‍न तुम्हा आम्हाला पडू शकतो पण दिल्लीतील सातच्या सात खासदार असलेल्या भाजपला मात्र तो पडत नाही. अरविंद केजरीवाल यांच्या जबरदस्त आव्हानासमोर अंतर्कलहाने धापा टाकणाऱ्या भाजपने आज शाहीन बागेतील सीएएविरोधी निदर्शनांचा बहाणा काढून चक्क पाकिस्तानला ओढले. यासाठी भाजपने केजरीवालांचे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांचा आधार घेतला. मिश्रा यांनी शाहीन बागेसारखे मिनी पाकिस्तान विरोधकांनी दिल्लीत जागोजागी उभे केल्याचा बेफाम आरोप केला. 

मिश्रा यांनी तिरंगा व राष्ट्रध्वजासह होणाऱ्या शाहीन बागेतील प्रदर्शनांना थेट पाकशी जोडताना, 8 तारखेला दिल्लीत भारत विरूध्द पाकिस्तान अशी लढत होईल' अशी भाषा केली. केवळ भाजप विरोधकच नव्हे तर सामान्य दिल्लीकरांमध्ये त्याबाबत नाराजीची भावना आहे. भाजप व पाकिस्तानचे पर्यटनक्षेत्र यांच्या अंतस्थ संबंधांची चौकशी व्हायला हवी असा पलटवार विरोधी पक्षांनी केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र दिल्लीची जनता धार्मिक मुद्यांवर नव्हे तर कामावरच मतदान करेल असा विश्‍वास पुन्हा व्यक्त केला. 

दिल्लीच्या मटियाला, या सर्वांत मोठ्या मतदारसंघासह विकासपुरी व परिसरात झालेल्या "रोड शो' ला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने उत्साहित झालेल्या केजरीवाल यांनी, दिल्लीकर "दिलवाले' आहेत असे सांगून आभार मानले. यंदा केजरीवाल यांचा जोर सभांबरोबरच रोड शोवर राहणार असल्याचे संकेत आहेत. कॉंग्रेसने भाजपच्या " राग पाकिस्तानला' जोरदार आक्षेप घेतला आहे. पक्षप्रवक्ते जयदीप शेरगील म्हमाले की भाजप नेते सकाळी राष्ट्रवादाचे धडे देतात, दुपारी नेहरूंना शिव्याशाप देतात तर सांयकाळी पाकिस्तानचा राग आळवितात व रात्री पकोडे खाऊन झोपतात कारण मोदी सरकारच्या काळात लाखो तरूणांचे रोजगार गेले व ते बोरोजगार झाले. 

दिल्लीत केजरीवाल यांच्याविरूध्द तुल्यबळ उमेदवाराचीही वानवा असलेल्या भाजपने शाहीन बागेतील सीएएविरोधी प्रदर्शनांच्या निमित्ताने ध्रुवीकरणाचे कार्ड चालविणे सुरू केले आहे. मिश्रा यांनी तर दिल्लीची निवडणूक भारत-पाकिस्तानचा मुकाबला असेल असे भाकीत केले. ते भाजपचे उमेदवार आहेत. शाहीन बागेत हजारो प्रदर्शनकारी महिला हाती तिरंगा घेऊन व राष्ट्रगीताचे गायन करत गेले 40 हून जास्त दिवस शांततेने आंदोलन करत आहेत त्यातही मिश्रा यांना पाकिस्तान दिसल्याने तीव्र नाराजीची प्रतीक्रिया उमटली आहे. 

शाहीन बागेतील प्रदर्शनांमुळे या भागातील रहिवाशांना, नोकरदार, विद्यार्थी व रूग्णांना होणाऱ्या त्रासाचा मुददा रास्त असला तरी या प्रदर्शनांना पाकिस्तान समर्थक ठरविण्याचा मिश्रांच्या आडून केलेला खेळ भाजपला महागात जाण्याची शक्‍यता व्यक्त होते. शाहीन बागेसारख्या दिल्लीच्या अनेक रस्त्यांवर पाकिस्ताना प्रवेश झाला असून या देशाचा कायदाही हे पाळत नाहीत. दिल्लीच्या रस्त्यांवर दंगलखोरांचा कब्जा आहे, असेही मिश्रा म्हमाले. यावर कॉंग्रेसने भडकून, भाजपला निवडणूक अवघड जाणार हे दिसले की पाकिस्तान का आठवतो याची चौकशी व्हायला हवी असे प्रत्युत्तर दिले. 

केजरीवाल यांनी सीसीएला आपचा तीव्र विरोध कायम राहील असे सांगितले तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शाहीन बागेतील प्रदर्शनकर्त्यांसोबत आप उभा राहील असे सांगितले. त्याबरोबर मिश्रा यांनी साऱ्या निवडणुकीलाच भारत-पाकिस्तानचा रंग देऊन टाकला. दिल्लीच्य रस्त्यावर 8 फेब्रुवारीला भारत व पाकिस्तान असा महामुकाबला होईल असे मिश्रा यांनी म्हटले. आप व कॉंग्रेसने शाहीन बोगसारखे मिनी पाकिस्तान जागोजागी उभे केले आहेत. देशद्रोही जेव्हा जेव्हा भारतात पाकिस्तान उभा करतील तेव्हा तेव्हा देशभक्तांचा हिंदुस्तान जागृत होऊन उभा राहील असे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com