BJP and Congress' new campaign ideas in Nagpur | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
नितेश राणे यांना 8483 मतांची आघाडी पाचवी मतमोजणी फेरी पूर्ण
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर.
सिल्लोड : पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना 2167 मतांची आघाडी
पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर
बारामती : बारामतीत अजित पवार आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

नागपुरात भाजपची पालकमंत्री बावनकुळे, महापौर जिचकार यांच्यावर जबाबदारी

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 17 डिसेंबर 2018

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला नागपुरात सुरूवात झाली असून यात आश्‍चर्यकारकपणे कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. 

नागपूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला नागपुरात सुरूवात झाली असून यात आश्‍चर्यकारकपणे कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. 

लोकसभेसाठी कॉंग्रेसने वस्त्यावस्त्यांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात प्रचार मोहिम सुरू केली आहे. भाजपने नागपुरात लोकांचे प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार यांच्यावर सोपविली आहे. दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. 

नागपुरातील भाजपचे उमेदवार निश्‍चित आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उमेदवार राहणार आहेत. 
कॉंग्रेसमध्ये आजच्या घडीला 8 ते 10 जण इच्छुक आहेत. यात नागपुरातील कॉंग्रेस दोन गटामध्ये विखुरलेली आहे. यातून कॉंग्रेस उमेदवारांची निवड करणे कॉंग्रेस श्रेष्ठींसाठी कठीण काम आहे. तरीही नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. 

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांची निवड करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार विकास ठाकरे यांनी शहरातील 2 हजारावरील बुथवर कार्यकर्त्यांची निवड केली आहे. या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकास ठाकरे झोपडपट्ट्या व वस्त्यांमध्ये जाऊन मोदी सरकारने दिलेले आश्‍वासने पूर्ण झाली काय? अशी विचारणा लोकांनाच करीत आहेत. कॉंग्रेसचा हा प्रचाराचा फंडा चांगलाच लोकप्रिय होत आहे. 

भाजपने या प्रचारात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार यांना उतरविले आहे. नागपुरातील 10 झोनमध्ये जनता दरबार व प्रत्येक वस्त्यांमध्ये फिरून लोकांचे प्रश्‍न घेण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहेत. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी पालकमंत्री जन संवाद मोहिम राबवून लोकांच्या समस्या सोडवित आहे तर महापौर नंदा जिचकार वस्त्यांमध्ये जाऊन लोकांना भेटत आहेत. तेथील जनतेच्या समस्या समजून घेत आहे. आता कोणत्या पक्षाचा प्रचार मतदारांच्या विश्‍वासाला पात्र ठरेल, हे लोकसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख