प्रदेशाध्यक्षांच्या वेळेसाठी लांबविले भाजप सदस्य नोंदणी अभियान...

 प्रदेशाध्यक्षांच्या वेळेसाठी लांबविले भाजप सदस्य नोंदणी अभियान...

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. 6 जुलैपासून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या मोहिमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात सुरुवात करण्यात आली. देशभरात एकाच वेळी हे अभियान प्रारंभ झाला असला तरी, औरंगाबाद शहर याला अपवाद ठरला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची 6 जुलैला वेळ न मिळाल्यामुळे ते 7 जुलैपासून सुरु होणार आहे. कार्यक्रमाविषयी योग्य नियोजन न झाल्यामुळेच अभियान लांबले असल्याची चर्चा केली जात आहे. 

लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. याच माध्यमातून भाजप सदस्य नोंदणीची अभियान हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार 6 जुलैला देशभरात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. औरंगाबादेतही ठरलेल्या दिवशी होणार होती, मात्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची वेळ न मिळाल्याचे कारण देत जिल्हा कार्यकारिणीतर्फे हा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला. विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वी सदस्य नोंदणीसाठी भाजप जिल्हा कार्यालयात दोन बैठकाही झाल्या. मात्र प्रदेशाध्यक्षांची वेळ न मिळाल्यामुळे कार्यक्रम लांबविल्याचे जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले. 

राज्य कार्यकारर्णीप्रमाणेच जिल्हा कार्यकारिणीची मुदत संपत आली आहे. विद्यामान शहराध्यक्ष व कार्यकारिणीत बदल होणार असल्याचीही चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षात नव्या व जुन्याचे मतभेदही काही प्रमाणावर समोर येत आहे. अभियानाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीतही पुढे बसण्यावरून मानपानाचे नाट्य कार्यकर्त्यांत झाल्याची माहिती समोर येत आहे. 

राज्यमंत्री अतुल सावे यांची मंत्रिमंडळात समावेश झाल्यामूळे त्यांच्या मतदारसंघाचे वर्चस्व भाजपच्या गोटात वाढले आहेत. यामूळे उद्या होणारा भाजप सदस्य नोंदणीचा कार्यक्रम जिल्हा कार्यालया ऐवजी राज्यमंत्री सावे यांच्या मतदारसंघातील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात ठेवण्यात आला आहे. यामुळे जिल्हा कार्यकारिणीपेक्षा औरंगाबाद पूर्वचे पदाधिकारी, नगरसेवक, वार्ड अधिकारी, शक्‍तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख यांच्यातर्फे या कार्यक्रमाची प्रचार आणि माहिती सर्वत्र देण्यात येत आहे. जिल्हा कार्यकारिणीतर्फे या विषयी कुठलीच माहिती देण्यात येत नसल्यामूळे एक गट नाराज झाल्याचीही चर्चा आहे. 

या विषयी शहराध्यक्ष किशनंचद तनवाणी यांच्याशी संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही. याविषयी प्रसिद्धीप्रमुख राम बुधंवत यांना विचारले असता,ते म्हणाले, रविवारी औरंगाबाद पूर्वमध्ये सदस्य नोंदणी कार्यक्रम होणार असल्याचा संदेश आल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्षांसाठी कार्यक्रम लांबविला असला तरी, भाजप मधील अंतर्गत राजकारणही आता समोर येऊ लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com