शिवसेनेच्या ताठर भूमिकेमुळे भाजपची " मेरा परिवार-भाजप परिवार' मोहीम जोरात

शिवसेनेच्या ताठर भूमिकेमुळे भाजपची " मेरा परिवार-भाजप परिवार' मोहीम जोरात

औरंगाबाद : एकीकडे शिवसेनेशी युतीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 48 मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेची ताठर भूमिका मवाळ होत नसल्यामुळे भाजपने आता राज्यासह औरंगाबादेत " मेरा परिवार-भाजप परिवार ' ही मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे. या अंतर्गत शहराचे हद्‌यस्थान आणि शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडीवरूनच घरोघरी भाजपचा झेंडा लावण्यास सुरूवात झाली. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून ही मोहिम राबवण्यात येत आहे. भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी जनसंघ आणि भाजपशी गेल्या अनेकवर्षापासून एकनिष्ठ असलेल्या गुलमंडी येथील बसैय्ये बंधु यांच्या घरावर भाजपचा झेंडा लावून "मेरा परिवार-भाजप परिवार' मोहिमेची सुरूवात केली. 

आजपासून सुरू झालेली ही मोहीम दोन मार्चपर्यंत सुरू राहणार असून बुथ पातळीपर्यंत पोहचून शहरातील प्रत्येक घरावर भाजपचे कमळ असलेला झेंडा लावण्याचा संकल्प करण्यात आल्याचे तनवाणी यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. या शिवाय लवकरच जनतेला आपल्या मनातील प्रश्‍न म्हणेजच "मन की बात' पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टकार्डाच्या माध्यमातून विचारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

यासाठी भाजप मुख्यालयातून खास पोस्ट पेट्या तयार करण्यात आल्याअसून त्या शहरात पाठवण्यात येणार आहेत. मन की बात मोहिमेत सर्वसामान्य लोकांच्या मनातील प्रश्‍न त्यांनी पोस्टकार्डवर लिहून ते या पेटीत टाकायचे आहेत. यातील निवडक प्रश्‍नांना पंतप्रधान मोदी उत्तर देणार असल्याचे बोलले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com