भाजपच्या आयुक्त हटाव मोहिमेवर शिवसेनेची सावध भूमिका

आयुक्तांकडून मात्र याबाबत कोणतेच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता हा वाद सत्ताधारी भाजपच्या पक्ष नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. आयुक्तांच्या कारभाराविषयी सत्ताधाऱ्यासोबतच विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यातूनच आयुक्तांविरुद्धच्या अविश्‍वासाच्या हालचाली सुरू झाल्या असून भाजपकडून नगरसेवकांची स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे.
 भाजपच्या आयुक्त हटाव मोहिमेवर शिवसेनेची सावध भूमिका

अकोला : महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या विरोधात सत्ताधारी भाजपने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेवर विरोधी पक्षांनी सावध भूमिका घेतली आहे. आयुक्तांच्या कारभाराविषयी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप बमसंच्या काही नगरसेवकांची तीव्र नाराजी आहे. मात्र, भूमिगत गटार योजनेच्या ठरावाबाबतचा भाजपचा पूर्वानुभव बघता, आधी अश्विश्वास आणा आणि आमच्या नेत्यांशी बोला, अशी भूमिका शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून अकोला महापालिकेत आयुक्त अजय लहाने विरुद्ध नगरसेवक असा सामना रंगला आहे. त्यातच भरीर भर म्हणून आयुक्त अजय लहाने यांनी स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना दिलेल्या पत्रात जी अपमानास्पद भाषा वापरली त्यावरून सत्ताधारी विरुद्ध आयुक्त असा जोरदार संघर्ष मनपात सुरू आहे. आयुक्तांच्या पत्रानंतर सभापती बाळे टाले यांनी आतापर्यंत तीन वेळा आयुक्तांना पत्र देऊन काय कारवाई करणार याबाबत स्मरणपत्र दिले आहे. 

आयुक्तांकडून मात्र याबाबत कोणतेच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता हा वाद सत्ताधारी भाजपच्या पक्ष नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. आयुक्तांच्या कारभाराविषयी सत्ताधाऱ्यासोबतच विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यातूनच आयुक्तांविरुद्धच्या अविश्‍वासाच्या हालचाली सुरू झाल्या असून भाजपकडून नगरसेवकांची स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनाही विशेष सभा बोलाविण्यासाठी स्वाक्षरी मागण्यात आली. 

मात्र, भूमिगत गटार योजनेच्या ठरावाबाबतचा पूर्वानुभव बघता यावेळी शिवसेनेने आधी अविश्‍वास ठराव आणा आणि आमच्या नेत्यांशी बोला अशी, भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपला त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अविश्‍वासाचा लढा लढावा लागत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com