सत्ताधारी कर्जमुक्ती करण्यात दंग, विरोधक आंदोलनाच्या नियोजनात तंग

शेतकऱ्यांना काहीतरी दिले म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खूष आहेत, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलने होणार आहेत
BJP Agitations Against Uddhav Thackeray Government Today
BJP Agitations Against Uddhav Thackeray Government Today

नगर : शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षाच्या महाआघाडीचे नेते सध्या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त केल्याच्या आनंदात आहेत. तर दुसरीकडे विरोधक असलेला भाजप पक्षाचे नेते मात्र या सरकारचे ओरखाडे काढण्यासाठी आज (ता. २५) धरणे आंदोलन करण्यात तंग झाले आहेत.

शेतकऱ्यांना काहीतरी दिले म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खूष आहेत, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलने होणार आहेत.  हे विरोधाभासाचे चित्र सध्या जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात निर्माण झाले आहे.

आज राज्यात कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोन लाखांपुढील शेतकऱ्यांनाही विशेष योजनेद्वारे कर्जमुक्ती करण्याकडे सरकारचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज पहिली यादी प्रसिद्ध होऊन नगर जिल्हा त्यात अव्वल ठरला आहे. सर्वात जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सीद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना आनंदी राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येक लाभधारक शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीमुळे दिलासा मिळाला आहे. 

मंगळवारी भाजपचे आंदोलन

विविध प्रश्नांसाठी भाजपने उद्या राज्यभर आंदोलनाचा नारा दिला आहे. नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात येणार आहेत. नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालवायासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. या दरम्यान भाजपचे नेते विविध मागण्यांसाठी सरकारवर तुटून पडणार आहेत.

अधिकाऱ्यांना देणाऱ्या निवेदनात भाजपने विविध मागण्या केल्या आहेत. गेल्या महिनाभरात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना होत असताना मंत्री मात्र गावोगावी सत्कार स्विकारत आहेत. अॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार अशा महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यात हे सरकार अपयशी ठरले, अशा मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे.

भाजपचा विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेच्या प्रमुखांनी तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेली मदतीची घोषणा फोल ठरली आहे. सरसकट कर्जमाफी करून म्हणणाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले, असा ओराप भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com