आज हिवाळी अधिवेशनात 'मी सावरकर'चा आवाज निनादणार

माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, असे म्हणत गांधी यांनी सावरकर यांच्यावर टिका केली होती. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल मुद्दे उपस्थित केले होते. यावरुन भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे.
BJP Will be aggressive in Winter Session over Sawarkar Issue
BJP Will be aggressive in Winter Session over Sawarkar Issue

नागपूर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून आज सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याची तयारी भाजपने केली आहे. 

माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, असे म्हणत गांधी यांनी सावरकर यांच्यावर टिका केली होती. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल मुद्दे उपस्थित केले होते. यावरुन भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. आज भाजपचे सर्व आमदार भगव्या रंगाच्या 'मी सावरकर' लिहिलेल्या टोप्या घालून विधानभवनात येण्याची शक्यता असून सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव. सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भाजप सभागृहाचं कामकाज पहिल्याच दिवशी बंद पाडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भारतीय जनता पक्षावर टिका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड भारताचे स्वप्न बघितले होते. मात्र नागरिकत्व विधेयकाच्या माध्यमातून भाजपनेच त्यांच्याच धोरणांना तिलांजली दिली आहे. मूळ प्रश्‍नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा आणि देशाला अशांत ठेवण्याचे केंद्र सरकारचा डाव आहे, असे ठाकरे काल म्हणाले होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com