अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्यांनीच केला घंटानाद

नेवाशात सत्ताधारी भाजपने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्येलायासमोर केलेले 'घंटानाद' आंदोलन हे तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्यांनाच आंदोलन करावे लागत असल्याने सत्ताधारी विरोधकांचे टीकेचे धनी झाले आहेत.
अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्यांनीच केला घंटानाद

नेवासे : नेवाशात सत्ताधारी भाजपने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्येलायासमोर केलेले 'घंटानाद' आंदोलन हे तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्यांनाच आंदोलन करावे लागत असल्याने सत्ताधारी  विरोधकांचे टीकेचे धनी झाले आहेत.

नेवासे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे रखडलेली कामे त्वरित मार्गी लावा, या मागणीसाठी भाजपच्यावतीने तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच 'घंटानाद' आंदोलन झाले.  या कामांसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध असताना देखील संबधित ठेकेदाराने फक्त रस्ता डांबरीकरणाचे काम केले. उर्वरित सर्वच कामे रखडली आहे. दरम्यान, उपअभियंता सुनील नरसाळे यांनी एक महिन्यात संबंधित ठेकेदाराकडून हे कामे काढून नव्याने निविदा काढण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

हे आंदोलन मात्र विरोधकांच्या चांगल्याच पथ्यावर पडले आहे. आंदोलनाची खिल्ली उडविताना काॅंग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखाधान म्हणाले, "भाजपाचे हे आंदोलन म्हणजे 'चोरांच्या उलट्या बोंबा'च आहे.'' याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ म्हणाले, ''नेवाशाचा विकास व्हावा, यात राजकारण असूच नये, आंदोलनापेक्षा सत्तेतून त्यांनी कामे करावीत.'' क्रांतिकारी पक्षाचे युवा नेते महेश मापारी प्रतिक्रिया देताना म्हणाले, "अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे यातून सिद्ध होते. सत्तेत असतांना आंदोलन, हे साताधार्यांचे अपयशच समजावे. शिवसेनेने ठेकेदारीला लक्ष्य केले. शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन जगताप म्हणाले, ''नेवाशाचा ‘विकास’ हरवला आहे. सत्ताधारी, अधिकारी व ठेकेदारांमुळे नेवाशाला बुरे दिन आले आहेत."

भाजपने अधिकाऱ्यांवर ठेवले बोट
आमदार मुरकुटेंनी नेवासे तीर्थक्षेत्रासाठी 2 कोटी 80 लाख निधी आणला, मात्र संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यामुळेच हे कामे रखडली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com